देवाचिये दारी,कीर्तनाची वारी"या कार्यक्रमात औशाच्या कुमार पाटील यांचे कीर्तन

 "देवाचिये दारी,कीर्तनाची वारी"या कार्यक्रमात औशाच्या कुमार पाटील यांचे कीर्तन





औसा (प्रतिनिधी)देवाचिये दारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाअंतर्गत फक्त मराठी या वाहिनीवरून अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष ह.भ.प. कुमार पाटील गांजन खेडा यांचे नामसंकीर्तन आणि या कार्यक्रमासाठी मारुती राम गुरव यांनी मृदंगाची साथ संगत करून संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाच्या श्रोत्यांची मने जिंकली.

औसा तालुक्यातील दोन कार्यकर्त्यांना फक्त मराठी या वाहिनीवरून आपली कला सादर करण्याची संधी मिळाली या कलावंतांनी वारकरी संप्रदायाचा वारसा जोपासत फक्त मराठी या वाहिनीवरून संपूर्ण महाराष्ट्रातील विठ्ठल भक्तांना भक्तिरसात नाहून निघण्याची संधी प्राप्त करून दिली.

कुमार पाटील आणि मारुती गुरव यांचे औसा तालुक्यात वारकरी मंडळी व विठ्ठल भक्ताच्या भक्तांनी कौतुक केले आहे.


शनिवार दिनांक 22 मे रोजी सकाळी साडेसात वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण झाले असून याच कार्यक्रमाचे पुन्हा प्रश्न पुन्हा प्रसारण सोमवार दिनांक 24 मे रोजी सकाळी सकाळी सहा तीस वाजता होणार आहे तरी श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या