औसा प्रतिनिधी
प्राध्यापक सोनाली ताई गुळभिले चांगभलं सेवा संस्था अध्यक्ष यांनी कोरोना च्या संकटामुळे आपल्या वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विविध सामाजिक उपक्रम राबवले. बुधडा येथील अंध अपंग वस्तीग्रह येथे सॅनिटायझर, मास्क ,जीवनावश्यक वस्तू वाटप केले. तसेच ग्रामीण रुग्णालय औसा व पोलीस स्टेशन औसा येथे कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून इतर सर्वसामान्य जनतेचे जीवन वाचवणाऱ्या सर्व वैद्यकीय अधीक्षक ,डॉक्टर, नर्स पोलीस अधीक्षक , सर्व पोलिस कर्मचारी यांचा सत्कार करून सॅनिटायझर ,पाणी ,,बॉटल अल्पोपहार देण्यात आला .त्याचबरोबर कोविंड सेंटर औसा येथे जेवण वाटप करण्यात आले . प्राध्यापक सोनाली ताई यांच्या या कार्याचे औसा शहर व इतर सर्वत्र कौतुक होत आहे.. त्यांच्या या कार्यक्रमास उपस्थित प्रमुख वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव सर ,पी .आय. पटवारी सर, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती प्रदीप पाटील खंडापूरकर प्रदेशाध्यक्षा राणीताई स्वामी, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सुनील नावडे ,विजय कुमार सुतार रंजनाताई चव्हाण जिजाऊ ब्रिगेड अध्यक्ष ,योगिता ताई ठाकूर, बबीता ताई साळुंखे, आम्रपाली ताई सुरवसे. आकाश पाटील विनोद नजिले कुणाल दीक्षित ,भडके इतर सर्व.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.