चौकशी समिती गठीत करा अन्यथा आमरण उपोषण.
*मा. राज्यपाल महोदयांकडे साकडे*
*मुंबई दि (प्रतिनिधी) अंधेरी एमआयडीसी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत विकासक, काही भ्रष्ट अधिकारी व महादलालमार्फत 10 हजार कोटीं च्या भ्रष्टाचार झाला असून सेवानिवृत्त न्यायधीशां मार्फत चौकशी करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केलीं आहे.*
विमल शहा आकृती / हब टाऊन विकासक आणि खोट्या जातीच्या दाखल्यावर मतदार, निवडणूक आयोग व प्रशासनचो दिशाभूल करून निवडून येऊन नंतर मा. उच्चन्यायालयाने नगरसेवक पद रद्दबातल ठरविलेल्या फ्रॉड मुरजी पटेल यांनी तत्कालीन एमआयडीसीचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना हाताशी धरून अंदाजे10 हजार रुपयांच्या वर महाघोटाला केला आहे.
आजही शेकडो झोपडी धारक स्वतःच्या मालकीचे घरे तोडून देऊनही प्रकल्पाच्या लाभापासून वंचित आहेत, २० वर्ष होऊन गेले सदनिका नाही ना भाडे धनादेश नाही. विकासक एफएसआय च्या इमारतीला ओसी मिळवून ऑफिस व बस्तान घेऊन पलायन केले आहे.
विकासक विमल शहा, फ्रॉड पडेल नगरसेवक मुरजी पटेल व त्या-त्या वेळचे भ्रष्ट अधिकारी यांची वंशावळ चौकशी करावी व सदनिकेपासून वंचितांना लाभ मिळवून दयावा अशी मागणी डॉ. राजन माकणीकर व राज्य महासचिव श्रवण गायकवाड यांनी केली आहे अन्यथा राजभवन समोर डॉ राजन माकणीकर आमरण उपोषण करतील असा इशाराही निवेदनामार्फत मुंबई मा. पोलीस आयुक्त व मा. राज्यपालांना दिला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.