शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी छावा रस्त्यावर उतरणार

 शेतकऱ्यांना पैसे मिळवून देण्यासाठी छावा रस्त्यावर उतरणार

औसा प्रतिनिधी

 विलास तपासे





वाढिव खत दराविरोधात शेतकऱ्यांना वाढता रोष पाहता केंद्र सरकारने खत कंपन्यांचा सबसिडी देऊन खतांच्या किमती कमी केल्या मात्र जादा पैसे देऊन खरेदी केलेल्या खतांची विक्री काही दुकानदारांनी एमआरपी प्रमाणे केली होती. आता खताचे दर कमी झाल्याने ज्या शेतकऱ्यांनी वाढिव दराने खते खरेदि केले त्यांना भाव फरकाची रक्कम तातडीने व्यापाऱ्याला द्यावी अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे शेतकरी नेते विजयकुमार घाडगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली रासायनिक खतांची भरसाठ दरवाढ केल्याने केंद्रसरकारवर टिकेची झोड उठली होती. त्यामुळे सरकारने खत उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना वाढिव सबसिडी देत दरवाढ थांबवली मात्र खरिप हंगाम जवळ आल्याने काहि व्यापाऱ्यांनी रोख रक्कम मोजत वाढिव दराने खत विकत घेऊन ते शेतकऱ्यांना विकलेही, आता १,९००  रुपयांवरून डीएपीचा भाव पुन्हा १२०० रुपये झाला. जास्त दराने खरेदी केलेल्या खताची विक्रीही जादा दराने व्यापाऱ्यांना केली मात्र आता दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना दोनशे ते तीनशे रुपयांचा प्रति बॅग फटका बसला. आता शेतकरी वाढिव दराने खरेदी केलेल्या खतांचा भाव फरक द्यावा अशी मागणी श्री विजयकुमार घाडगे यांनी केली वाढिव दराने व्यापाऱ्यांनी खतांची खरेदी केली. पॉस मशीनवर आलेल्या दराप्रमाणे विक्री केली. आता दर कमी झाल्याने जरी शेतकरी फरक रक्कम  मागत असले तरी ही रक्कम संबधित कंपनीने व्यापाऱ्यांना दिल्यावरच शेतकऱ्यांना देणे शक्य होणार आहे

जादा दराने विक्री करण्याच्या सूचना कृषी विभाग देत असले तरी व्यापाऱ्यांची रक्कम कोण आणि कधी देणार या बाबत ठोस निर्णय नाही. जर कंपन्यांची भाव फरक दिला तरच शेतकऱ्यांना ती रक्कम देणे शक्य होणार असल्याचे व्यापारी सांगत आहेत. कंपन्या आणि शासनाच्या धोरणाच्या कात्रीत सध्या व्यापारी अडकले आहेत

..........................................................................................................................................

                      



गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने खतदरवाढ करुन शेतकऱ्यानां खुप मोठ्याप्रमानात आर्थीक अडचनित टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु या खतदरवाढीच्या विरोधात अखिल भारतीय छावा संघटनेच्यावतीने राज्यभर या खतदरवाढीला विरोध करन्यात आला होता व देशाच्या पंतप्रधानांना सुद्धा खतदरवाढ मागे घेण्यासाठी निवेदन देऊन मागनी केली होती सबंध राज्यातुन व देशभरातील शेतकऱ्यानी दरवाढीला विरोध केल्यामुळे केंद्र सरकारने केलेली दरवाढ मागे घेतली परंतु या दरवाढ केलेल्या कालावधीमध्ये राज्यातील बऱ्याच शेतकऱ्यांनी वाढीव दलातील खत खरेदी केला अनेक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडुन आर्थीक लुट झाली आहे त्यामुळे छावा संघटनेच्यावतीने व्यापाऱ्यांना हा इशारा आहे ज्या शेतकऱ्यानी  आपल्या कडुन जास्तीचे पैसे देऊन खत खरेदी केला आहे अशा शेतकऱ्यानां त्यांचे जास्तीचे पैसे वापस करावे अन्यथा छावा संघटना व शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल 

व शेतकरी बांधवांना छावा संघटनेच्यावतीने आव्हान करण्यात येत आहे की जर कुठला व्यापारी पैसे परत द्यायला त्रास देत असेल तर आपण छावा संघटनेच्या पदाधीकाऱ्यांना संपर्क साधावा  असे आव्हान विजयकुमार घाडगे  यांनी केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या