नोंदणी प्रमाणपत्र नसलेले जर व्यवसाय करत असतिल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई


नोंदणी प्रमाणपत्र नसलेले जर व्यवसाय करत असतिल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई




औसा प्रतिनिधी 

राज्यात अनेक अप्रशिक्षित मुल मुली स्वतंत्र रित्या वा कार्पोरेट पॅथोलॉजिस्ट चे नावा खाली सोशल मिडिया,जस्ट डायल अशा साईटवर प्रचार करून तसेच अनेक मोठ्या कार्पोरेट पॅथोलॉजी लॅबोरटरिज आपली अप्रशिक्षित मुल घरपोच सेवा देण्याच्या नावाखाली पाठवुन रुग्णांना स्वस्त पॅकेज चे आमिश दाखवून रुग्णांनचे रक्त नमुने गोळा करत आहेत. नागरिक, सदर लॅब ही कुठे आहे ? कशा प्रकारे काम चालते? महाराष्ट्र राज्य वैद्यकीय परिषद वा महाराष्ट्र पॅरावैदक परिषद रजिस्टर एम डी वा मेडिकल लॅबोरेटरी टेक्नोलॉजिस्ट द्वारा संचालित आहे का? याची शहानिशा करत नसल्याने अशा प्रकारचा गोरख धंदा राज्यात सर्वत्र छोट्या मोठ्या शहरातुन होत आहे. पॅथोलॉजी लेब वा क्लिनिकल लेबोरेटरी या मधे कार्यरत प्रतेक व्यक्ती मग तो रक्त संकलन करणारा व्यक्ती असला तरिही तो वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदवी, पदविका प्राप्त व महाराष्ट्र पॅरावैदक परिषद नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. जर तो महाराष्ट्र पॅरावैदक परिषद नोंदणी असलेला असेल तर त्याचे जवळ तसे प्रमाणपत्र व ओळख पत्र असणे आवश्यक आहे ज्यावर त्याच्या पॅरावैदक शैक्षणिक पात्रता व नोदणी क्रमांक व त्याचे नाव असते. तेंव्हा राज्यातिल सर्व नागरिकांना महाराष्ट्र पॅरावैदक परिषदे तर्फे ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी संबंधित लॅब व तिथुन आपणा कडे रक्त संकलन करण्यास आलेल्या व्यकिस त्याचे महाराष्ट्र पॅरावैदक परिषद ओळख पत्र दाखवण्याची विनंती करावी व सर्व खात्री झाल्यावरच त्याला रक्त वा ईतर नमुने घेऊन जाण्याची परवानगी द्यावी.अन्यथा बोगस लॅब मधुन जर आपले रक्त व ईतर सेंपल चे रिपोर्ट आपणास मिळाले तर त्यामुळे आपल्यावर उपचार करणार्या डॅक्टरांना रोग निदान करून उपचार करताना चुकिचा रिपोर्ट मिळाल्याने आपले स्वास्थ्यासाठी धोकादायक होउ शकते.

       राज्यात संचालित क्लिनिकल लेबोरेटरी या महाराष्ट्र पॅरावैदक परिषद कायद्याने स्थापित पॅरावैदक व्यावसायिक व्यक्ती वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ ( medical laboratory technologist) यांच्या आहेत व ते महाराष्ट्र पॅरावैदक परिषद नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 

          परिषद व कायदा २०१७ ला अस्तित्वात आल्याने बरेच पॅरावैदक व्यावसायिक व्यक्ती यांनी परिषदेकडे वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणुन रजिस्ट्रेशन मिळण्यास अर्ज केला आहे कोविड पेंडमिक मधे बरेच जणांचे रजिस्ट्रेशन पेंडिग असुन त्यांचे जवळ रजिस्ट्रेशन साठी अर्ज केल्यानंतर पैसे भरल्याची परिषदेची पावती देण्यात आली आहे या बाबत आपण खात्री करून घ्यावी तसेच आपण परिषदेच्या संकेतस्थळावर वा ई-मेल, दुरध्वनी  वर विचारुन खात्री करुन घेउ शकतात. 

    अनधिकृत नोंदणीकृत नसलेले यांचे वर महाराष्ट्र पॅरावैदक परिषद कायदा कलम ३३ अंतर्गत शिक्षेचे प्रावधान असुन अशा नोंदणी प्रमाणपत्र नसलेले जर व्यवसाय करत असतिल तर त्यांचेवर कायदेशीर कारवाई होईल.


धनंजय कुलकर्णी

अध्यक्ष

महाराष्ट्र पॅरावैदक परिषद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या