ऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते..

 ऑनलाईन इंटरनेटमुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढते...

सोलापूर:(जि.प्र.गुफरान ईनामदार)





इंटरनेटवरुन होणारे आर्थिक व्यवहार, मोबाईल ॲपचा वाढता वापर यामुळे सायबर गुन्ह्यांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. अलीकडच्या काळात समाज माध्यमांचा वापर वाढला आहे. अगदी ती जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहेत. मात्र त्यांचाच वापर फसवणुकीसाठी ही केला जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. फेसबुक मेसेंजरव्दारे आजाराचे कारण पुढे करीत मदतीचे आर्जव केले जात आहे. खात्री न करता सहानुभुती दाखवणारे या जाळयात अडकत आहेत. त्यामुळे खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.डिजीटल क्रांतीमुळे सारे जग  हातात आले तसेच ऑनलाईन  फसवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. फेसबुक, व्हॉटसॲप ही समाजामध्ये तर जीवनाचा अविभाज्य भागच बनली आहेत. भामटयांनी फसवणुकीसाठी या समाजमाध्यमांचा वापर सुरु केला आहे.

फेसबुक मेसेंजरवर आपल्याला मित्राचा मेसेज येतो हाय, हँलो….. नंतर आजारी असल्याचे सांगितले जाते. पैश्‍याची गरज असल्याचे आर्जव केले जाते. पैसे पाठविण्यासाठी बँक खाते किंवा गुगलपे चा पर्याय दिला जातो. तुम्ही खात्री केली तर मेसेज पाठविणारा तुमचा मित्र नसुन भलतीच व्यक्ती असल्याचे लक्षात येते. मात्र खात्री न करता सहानुभुती दाखविणारे या भामटयांच्या जाळयात अडकत आहेत. शक्यतो कमी रकमेची मागणी केली जाते. त्यामुळे पैसे पाठविण्यासाठी फार विचार केला जात नाही. शिवाय महिलांना टारगेट करुन ही फसवणुक केली जात असल्याचे समजते.  फेसबुकचे नवीन खाते काढताना पासवर्ड बाबत फारशी काळजी घेतलेली नसते. अनेकदा मोबाईल क्रमांकच पासवर्ड म्हणुन वापरला जातो. त्यामुळे भामटयांकडुन अशी अकाऊंट हॅक करुन फसवणुकीसाठी वापरली जातात. शिवाय बनावट खातेही तयार केली जातात. अगदी फोटोही वापरले जातात. मूळ खात्यावरील मित्रांना बनावट खात्यावरुन फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते. याव्दारेही फसवणुक हॉस्पिटल मध्ये आहे. अडचणीत आहे असे एक ना अनेक कारणे सांगुण पैसे मागण्याचा प्रकार सर्रास होत असल्याचे दिसुन व आढळुन आले आहे. महिलांचा फोटो व अभिनेत्रीचे महिलांचे फेक फेसबुक अकौंन्ट काढुन मुलांना प्रेमाच्या जाळयात अडकविण्याचा प्रकार समोर येत आहे.

जिथे पैसा, तिथे धोका हे तत्व सायबर गुन्हांमध्ये दिसुन येते. ई शॉपिंग, ऑनलाईन बँकिंग, मोबाईल ॲपमधुन होणाऱ्या खरेदी विक्री व्यवहारातुन मोठया प्रमाणात पैसे हडप केले जातात. त्यामुळे सायबर गुन्हांमध्ये आर्थिक गुन्हांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे बोलले जात आहे. बँक खाते, डेबिट-क्रेडिट कार्ड, ईमेल याचा पिन वा पासवर्ड कोणालाही देऊ नये असे वारंवार सांगण्यात येते. बँकांसह सायबरतज्ञ, पोलिस यंत्रणा ही सूचना करत असतात. परंतु बँकेतुन कॉल आल्याचे भासवणाऱ्या भामटयांवर अतिविश्वास ठेवणे ग्राहकांना भोवते. लोकांचा ॲपवर, बँकेच्या प्रक्रियेवर विश्वास असल्याने त्याची खातरजमा करण्याची तसदी घेतली जात नाही. 

गुन्हेगारांकडे काही वेगळे, अदयावत या नवीन तंत्रज्ञान नसते. परंतु ते मानवी कल लक्षात घेऊन सापळा रचतात. ई-मेल, ॲप लिंक, बोगस कॉल सेंटर वगैरे सापळे रचले जातात. त्या सापळयात अडकविण्याचे तंत्र मोडुन काढण्यासाठी सर्वसामान्यांनी सतर्क रहावे. बँकेमधुन फोन आल्याचे भासवणाऱ्या भामटयाकडे आपल्या खात्याचा बऱ्यापैंकी तपशील असतो. बँकांकडुन पुरविल्या जाणाऱ्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाच्या सुरुवातीचे काही क्रमांक सारखेच असतात. हे भामटे तेच क्रमांक सांगतात आणि लोकांचा त्यावर विश्‍वास बसतो. वेगवेळया ऑफर वगैरेच्या नावाखाली मोबाईल क्रमांक घेतले जातात. यातुन मोबाईलचा डेटा मोठया प्रमाणात जमा होऊन त्याची विक्री होते. म्हणुनच वेगवेळया कंपन्या, बँकांच्या एजन्सीकडून सारखे फोन येतात. लॉटरी लागल्याचा अचानक येणारा ईमेल, विम्याची रक्कम, नोकरीची संधी, दामदुप्पट रक्कम आदी मोहाच्या सापळयात शेकडो जण अडकतात अशी रक्कम आपल्याला का आणि कोण देणार याचा विचार केला जात नाही. त्यासाठी ओटीपीपासूनची माहिती लगेचच पुरविली जाते. नंतर मात्र फसवणुक झाल्याचे लक्षात येते. 

ई-व्यवहार काही सेकंद, मिनिटांचा असतो. देश वा परदेशातुन केल्या जाणाऱ्या घोटयाळयाचा तपास करणे बऱ्याचदा अवघड ठरते. ऑनलाईन ठगांकडुन ही रक्कम एटीएमवरुन काढून घेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे एकदा रक्कम काढली गेली की त्याचा तपास करणे अवघड ठरते. केवळ ई-व्यवहार नाही तर, सोशल मीडियावर वावरताना विशेष काळजी घ्यावी. त्यावर लोकेशन खासगी माहिती, फोटो शेअर करु नयेत. गुन्हेगार त्याचा फायदा घेऊन मॉर्फिंग आदी स्वरुपात महिलांना लक्ष्य करु शकतात. या गुन्हांना रोखण्यासाठी सावधगिरी बाळगावी. महिलांचे, गर्लफ्रेंड चे फोटोचा दुरुपयोग करुन तिच्याकडुन पैश्याची व लग्नाची, शारीरिक सुखाची मागणी करण्याचा प्रकार सर्रास आढळुन येतो. त्यामुळे महिला मानसिक त्रासातुन वेदना मध्ये गुंतल्या जातात. त्यातुन बाहेर पडणे पीडित महिलेला फार अवघड जाते. 

भारतीय दंड संहितेतील कलम इंटरनेटवरील मजकुरास लागु होतात. भारतीय दंड संहिते मधिल अनेक कलम लागु होतात. भारतीय न्यायव्यवस्था मजबुत आहे हे भारतीयांचे भाग्य आहे. परंतु प्रत्येकवेळी न्यायव्यवस्था मदतीस येणार नाही. त्यासाठी नागरिकांनीच अधिकाधिक जागृत होणे गरजेचे आहे. एकंदरित सोशल मिडीयाचा वापर करत असताना त्याचा अतिरेक नको त्यांच बरोबर सावधगिरी व संवेदना जागृत ठेऊन त्याचा वापर व्हावा असा संदेश दिला तर चुकीचा ठरु नये.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या