*मरखेल पोलीस स्टेशन हद्दीतील
सर्व गावातील नागरिकांना महत्वाची सूचना
मरखेल संतोष चिद्रवार प्रतिनिधी
गेल्या एक महिन्यापासून एक अनोळखी इसम मोटारसायकल वरून येत आहे व तो रस्त्याने चालत जाणारे, किंवा बसस्टँड वर वाहनांची वाट पाहत थांबलेले वयस्कर व्यक्तींना कोठे जायचे आहे असे विचारून त्याने एखाद्या गावचे नाव सांगितल्यास मी तेथेच जात आहे असे सांगून त्या वयस्कर व्यक्तीला त्याचे मोटारसायकल वर बसवून निर्मणूष्य ठिकाणी, घेऊन जाऊन त्या वयस्कर व्यक्तीकडे सुट्टे पैसे आहेत का विचारत आहे. वयस्कर व्यक्तीकडे पैसे असल्याची खात्री करून मग त्यांचे घरातील व्यक्तीचे ओळख सांगून ते पैसे अर्जन्ट काम आहे असे म्हणून घेऊन पळून जात आहे.
तरी सर्वांनी खबरदारी घ्यावी कोणत्याही अनोळखी व्यक्तींनी ओळख सांगून पैशाची मागणी केल्यास त्यांना पैसे देऊ नये. घरातील तरुण मुलांनी त्यांचे घरातील वयस्कर व्यक्तीकडे जास्त पैसे देऊ नये किंवा अनोळखी व्यक्तीचे गाडीवर न बसणे बाबत कल्पना द्यावी. खबरदारी घ्यावी . अशी अनोळखी व्यक्ती मिळाल्यास तात्काळ पोलीस स्टेशन मरखेल येथे कळवावे.
मो 9422336474
अदित्य लोणीकर
सहा. पोलीस निरीक्षक
मरखेल पोलीस स्टेशन
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.