दीदी ओ दीदी ; हमारे पिछवाडे पर लाथ क्यों मारी ?

 दीदी ओ दीदी ; 

हमारे पिछवाडे पर लाथ क्यों मारी ?

-------------------------------------------




पश्चिम बंगाल मध्ये ममता दीदी जिंकल्या.केवळ जिंकल्याच नाहीत तर त्यांनी नकली टगोराचे पुरते चिरहरण केले .भारताचे पंतप्रधान , गृहमंत्री , केंद्रातले सर्व मंञी , विविध राज्यातील खासदार , झुटूक मुटूक आमदार , हवा तेवढा पैसा , हवी ती यंञणा , निवडणूक आयोग , पुरे आरमार , सर्व राजकीय अस्ञ शस्त्र , जय श्री रामचा नारा , हिंदुत्व , अशी महा बलाढ्य  सामुग्री घेऊन , बंगाल सोनरी बनवण्याची घोषणा करुन आणि बंगालची अस्मिता , गुरुदेव टँगोरां सारखी वेष केशभूषा करुन , पंतप्रधान नरेंद्र दामोदरदास मोदी बंगाल जिंकायला गेले होते.दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकून कोलकत्तावर हिंदुत्वाचा झेंडा फडकवायला गेले होते.पण बंगालच्या सत्तर टक्के हिंदुंनी धर्मनिरपेक्ष विचारधारेच्या ममता बँनर्जी यांनाच पुन्हा प्रचंड बहूमताने विजयी केले आणि मोदीजींना चले जाव म्हटले.जिज्ञासू वाचकांनी 26 मार्च चे रिंगण पुन्हा वाचावे.

या निवडणूकी कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.कारण ममता बँनर्जीच भविष्यात भाजपाच्या भवितव्यावर अंतिम संस्कार करणार होत्या .तसे घडू नये यासाठी भाजपाने , संघ आणि त्यांच्या तमाम मातृ पितृ वगैरे सर्व संस्थानी आपली ताकद पणाला लावली होती.मोदी विरुद्ध ममता , हिंदुत्व विरुद्ध धर्मनिरपेक्षता अशी सरळ लढत होती.ममता जिंकल्या आणि मोदी हरले.केवळ हरलेच नाहीत तर मोदींनी भाजपाच्या भविष्यातील पराभवाचा शुभारंभ केला .होय ,भाजपाच्या भविष्यातील पराभवाचा शुभारंभ झाला.

बंगालच्या जनतेला हिंदुत्वाचे डोस पचले नाहीत .मोदी एक खोटारडे नेते आहेत.भाजपाच्या हातात राज्य आणि देश सुरक्षित आणि सुखी राहू शकत नाही , हे बंगालच्या 71% सुशिक्षित मतदारांनी हेरले आणि तिथेच मोदींना घेरले.निवडणूकीत भाजपाने सर्व स्टंट , प्रपोगंडा तंञ वापरले.तृणमुल काँग्रेस फोडून 40 विद्यमान आमदार भाजपात घेतले.काय साम दाम दंड वगैरे असतो तो वापरला .जाहीर सभेत पंतप्रधान असतांना " दीदी ओ दीदी " असे टिंगलीच्या सुरात ममतांना अपमानित केले .पण शेवटी बंगाल च्या जनतेनं भाजपाच्या हाती घंटा दिला.जाओ और बजाओ युपीमें म्हटले.

ही निवडणूक देशाला दिशा देणारी ठरणार आहे.कारण मोदी आणि त्यांची संकुचित विचारश्रेणी देशाला पुढे घेऊन जाऊ शकत नाही .हा देश भाजपाच्या धोरणाने प्रगती करु शकत नाही , हे या निमित्ताने निश्चित झाले.दीदी नंदिग्राम मध्ये पराभूत झाल्या परंतु देशात जिंकल्या आहेत.मोदीना आता त्याच आसमान दाखवतील.

ममता नंदिग्राम मध्ये पराभूत झाल्या .त्याचे कारण या मतदार संघात ममतांचेच राइट हँन्ड आणि बाहुबली नेते शुभेंदु अधिकारी भाजपाने फोडून आपल्या पक्षात घेतले होते.शिवाय तेच भाजपाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार असा संदेशही या मतदार संघात पोंहचवण्यात आला हौता.शिवाय नंदिग्राम हा शुभेंदुचा पारंपरिक मतदार संघ होता.त्यामुळे आणि या मतदार संघात ओतलेल्या धनशक्ति मुळे शुभेंदु विजयी झाले.हा विजय केवळ तांत्रिक आहे.शुभेंदु व्यक्ती म्हणून विजयी झाले.माञ ममता विचार म्हणून बंगाल मध्ये जिंकल्याच.

ममताच मुख्यमंत्री होतील हे सांगायला नकोच.

आता देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळेल.काँग्रेस या निवडणूकी पासून धडा घेईन व युपीएची नव्याने पुनर्रचना , बांधणी होईल.यात शरद पवार मोठी भुमिका बजावतील.देशातले सर्व भाजपा विरोधी पक्ष आता एकञ येतील.ममता युपीएच्या निमंञक म्हणून पुढे येतील.पश्चिम बंगाल ,महाराष्ट्र , तामिनाडू , केरळ , पंजाब , तेलंगाणा , दिल्ली , मध्य प्रदेश , हरियाणा सारखे राज्य आता भाजपा विरोधी आघाडीची धूरा सांभाळतील.संपूर्ण दक्षिण भारत भाजपा विरोधात उभा राहील आणि अर्धे उत्तर भारतातील राज्ये या नव्या आघाडीत सामील होतील.हे असे घडणार याची चाहूल भाजपाला लागली होती.त्यामुळे त्यांनी बंगालवर पूर्ण लक्ष केंद्रित केले होते.

भाजपाच्या सार्या मनसुंब्यावर बंगालने पाणी टाकले आहे.आणि भाजपाच्या पराभवाची कोनशीला बंगालनेच रोवली आहे.पंतप्रधान या महत्त्वाच्या पदावर असतांना आणि देशात कोरोनाने हजारो लोक मरत असतांना सुद्धा वीस वीस सभा मोदीजी घेतात आणि प्रत्येक सभेत ममतांची टिंगल करतात , हा प्रकार खूप भयानक होता.या भयानकतेला बंगाली जनतेनं लाथाडले आहे.मोदींचा इतका दारुण पराभव केला आहे की , आता पुढे कधीही कोणाला कमी समजण्याची घोडचूक करणार नाहीत .

भाजपा 3 वरुन 77 वर गेल्याची टिमगी गाजवतोय.नाक कापले तर भोंक आहेच की , असा याचा अर्थ आहे.आसाम किंवा पंदुचरी हे महत्त्वाचे राज्येच नाहीत .त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात या राज्यांना फारसे महत्त्व नसते.शिवाय काँग्रेस कुठे आहे ? असा प्रश्न ही भाजपावाले आपला पराभव लपवण्यासाठी उपस्थित करित आहेत.ममताच काँग्रेस आहे हे या भाजपाला कळत नाही .तृणमुलच्या  पुढे काँग्रेसच आहे.जसे राष्ट्रवादी च्या पुढे काँग्रेस .

आज भाजपाला झोप येणार नाही .कारण बंगाल एवढा झोडपील याची त्यांना कल्पनाच नव्हती .शिवाय सर्वजण झोपीत एकच बडबडतील.".दीदी ओ दीदी , हमारे पिछवाले पर इतनी जोर से लाथ क्यों मारी , पुरा बँक पसारा लाल लाल हो गया ."

मी ममताजींच अभिनंदन करतो.त्यांना भविष्यातील मोठ्या वाटचालीच्या शुभकामना देतो.भाजपवालेही भारतीयच.त्यांच्या दुःखातही सहभागी होतो.

                               ----- राजू पाटील , औसा.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या