पुलावरील सुरक्षा पाइप नसल्याने होत आहेत अपघात


पुलावरील सुरक्षा पाइप नसल्याने होत आहेत अपघात







औसा प्रतिनिधी

 राष्ट्रीय महमार्ग क्र 361 वरील  पटेल चौक स्थित  जुना फुल आहे. त्या पुलावरील रस्त्याच्या सुरक्षा करणारे लोखंडी पाइप अनेक वर्षा पासून तुटून पडले आहे  यामुळे पुलावरून प्रवास करणे त्रासदायक आणि धोकादायक झाले आहे. पुलावरील सुरक्षा भिंत म्हणून काम करणारे लोखंडी पाइप हे तुटून अस्ताव्यस्त पडले आहे यामुळे पावसाळ्यात वाहतूक करताना पुलावरून  जाते त्यावेळेस नेमका कोण कोठे आहे हे दिसत नाही. सदरील पुल बनवण्यात आलेल्या पुलाच्या रस्त्याच्या बाजूच्या लोखंडी पाईप ची दुरुस्ती करून नवीन बांधणी करावी यामुळे प्रवास करताना वाहन चलकचा तोल जाणार नाही व त्यांची सुरक्षा होईल यासाठी शेतकरी व वाहनधारक यातून मागणी होत आहे.प्रशासन या समस्या कळे लक्ष देईल का हेच पहावे लागेल 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या