जिल्ह्यात 45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण
सकाळी 10 ते सायं.5 वाजेपर्यंत सुरु राहणार
लातूर, दि.19(जिमाका):- लातूर जिल्हयातील कोवीड-19 लसीकरणाचे दिनांक 20 मे 2021 रोजीचे वेळापत्रक पुढील पुढील प्रमाणे आहे.45 वर्ष व त्यावरील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र- उपजिल्हा रुग्णालय उदगीर, उपजिल्हा रुग्णालय निलंगा, ग्रामीण रुग्णालय अहमदपूर, ग्रामीण रुग्णालय चाकूर, ग्रामीण रुग्णालय जळकोट, ग्रामीण रुग्णालय देवणी व ग्रामीण रुग्णालय किल्लारी येथे पहिला व दुसरा डोस कोविशिल्ड ऑनस्पॉट व जिल्हयातील सर्व प्रा. आ.केंद्र व कार्यक्षेत्र लसिच्या उपलब्धतेनुसार व सुक्ष्मकृती आराखडयानुसार सकाळी 10.00 ते सायं. 5.00 वाजेपर्यंत सुरु राहणार.
45 वर्ष व त्यावरील वयोगटातील लाभार्थीसाठी लातूर जिल्हयात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व त्यांचे कार्यक्षेत्रात उपलब्ध् साठयानुसार व प्रा.आ.केंद्राच्या सुक्ष्मकृती आराखडयानुसार दिनांक 20 मे 2021 रोजी कोवीशिल्ड लसीचे लसीकरण करण्यात येत आहे.
लातूर जिल्हयातील नागरीकांनी कोवीड-19 लसीकरणाबाबत काही अडचण असल्यास 02382-223002 कोवीड हेल्पलाईन नंबरवर संपर्क करावा असे अवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
वृत्त क्र.349
*महानगरपालिके मार्फत 45 वर्ष पुढील
वयोगटासाठीचे लसीकरण दोन केंद्रावर होणार*
*टाऊन हॉल येथे अठरा वर्षांपुढील दिव्यांगासाठी लसीकरण*
लातूर, दि.19(जिमाका):- लातूर शहर महानगरपालिकेमार्फत कोविड-19 लसीकरणाचे दिनांक 20 मे 2021 रोजीचे वेळापत्रक नागरिकांच्या माहितीसाठी पुढील प्रमाणे आहे. 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण केंद्र आयोजित करण्यात आलेले नाही. 45 वर्षे पुढील वयोगटासाठीचे लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे आहे, अशी माहिती लातूर शहर महानगरपालिकेचे उपायुक्त यांनी दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क (टाऊन हॉल) येथे कोव्हीशिल्ड लस दिव्यांग नागरीकांसाठी पहिला व दुसरा डोस (Drive-in-Vaccination Session)18 वर्षावरील दिव्यांग नागरीकांसाठी ज्या वाहनांमध्ये आलेले आहेत त्या वाहनांमध्ये लस देण्याची व्यवस्था करण्यात येईल.
विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, लातूर येथे कोव्हॅक्सीन लस 45 वर्षावरील नागरीकांना फक्त दुसरा डोस (मार्च महिन्यांमध्ये पहिला डोस घेतलेल्यांना प्राधान्य) व यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली ,लातूर येथे कोव्हीशिल्ड लस दिली जाणार आहे.
कोव्हिशिल्ड लसीचा पहिला डोस घेऊन 12 आठवडे (84 दिवस) पुर्ण झालेले व कोव्हीशिल्ड दुसरा डोस प्रलंबित असलेले HCW व FLW याचा दुसरा डोस उर्वरीत 45 वर्षावरील नागरीकांचा पहिला डोस ऑनस्पॉट सकाळी 10 ते सायं.5 वाजपर्यंत राहील.
शहरातील इतर लसीकरण केंद्र दि. 20 मे 2021 रोजी बंद राहतील याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन उपायुक्त लातूर शहर महानगरपालिका लातूर यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.