विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४
उदगीर, निलंगा विधानसभा मतदारसंघात आजपासून ‘होम वोटिंग’
• लातूर शहर, औसा मतदारसंघात १५ नोव्हेंबर रोजी गृह मतदान
लातूर, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील ज्येष्ठ मतदार आणि दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची (होम वोटिंग) सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील गृह मतदानाची प्रक्रिया सोमवारी झाली. तसेच उदगीर, निलंगा विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबर २०२४ रोजी गृह मतदान प्रक्रियेस सुरुवात होणार आहे. तसेच लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर २०२४ पासून गृह मतदान सुरु होईल.
८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग नागरिकांना गृह मतदानाची (होम वोटिंग) सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ही सुविधा ऐच्छिक आहे. गृह मतदानाचा विकल्प दिलेल्या मतदारांचे मतदान करून घेण्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान पथके स्थापन करण्यात आली आहेत. मतदानाच्या गोपनीयतेचा भंग होवू नये, यासाठी मतदान पथकातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच मतदान प्रक्रियेची पाहणी करण्यासाठी प्रत्येक मतदान पथकामध्ये एक मायक्रो ओब्जर्व्हर (सूक्ष्म निरीक्षक) नियुक्त करण्यात आला आहे.
लातूर ग्रामीण मतदारसंघात पहिल्यात टप्प्यातील गृह मतदान ११ नोव्हेंबर रोजी झाले असून १५ नोव्हेंबर २०२४ रोजी दुसरा टप्पा होणार आहे. लातूर शहर विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गृह मतदान करून घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अहमदपूर विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी, तर उदगीर विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर आणि १६ नोव्हेंबर २०२४ रोजी गृह मतदान होत आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात १४ नोव्हेंबर, १५ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गृह मतदान होईल. तसेच औसा विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर, १६ नोव्हेंबर आणि १७ नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे.
***
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department
Chief Electoral Officer Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.