निवडणूक खर्च निरीक्षक यांनी घेतला खर्च विषयक बाबींचा आढावा
निवडणूक खर्च निरीक्षक पथकांनी सतर्क राहून काम करावे - डॉ. रामसिंह गुर्जर
लातूर, दि. १३ : भारत निवडणूक आयोगाने उदगीर, निलंगा आणि औसा विधानसभा मतदासंघासाठी निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी खर्च विषयक पथकांच्या नोडल अधिकाऱ्यांचा आढावा घेतला. निवडणूक प्रचारासाठी मोजकेच दिवस शिल्लक असून या काळात कोणताही गैरप्रकार घडू नये, यासाठी सर्व खर्च विषयक पथकांनी अधिक सतर्क राहून काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
लातूर शासकीय विश्रामगृह येथे झालेल्या या बैठकीला जिल्हा परिषदेचे निवडणूक निरीक्षक समन्वय पथकाचे नोडल अधिकारी अप्पासाहेब चाटे, श्री. खडके, निवडणूक खर्च संनियंत्रण पथकाचे नोडल अधिकारी राजेंद्र नागणे, सी व्हिजील पथकाचे नोडल अधिकारी बालाजी मरे, स्थिर निगराणी व भरारी पथकाचे नोडल अधिकारी डॉ. शिंदे, वेब कास्टींगचे नोडल अधिकारी नितीन आगावणे, प्रसारमाध्यम कक्षाचे नोडल अधिकारी तानाजी घोलप यांच्यासह अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
प्रचार कालावधी संपण्यास आता मोजकेच दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे आगामी काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी कोणत्याही गैरप्रकारचा अवलंब होवू नये, यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांनी अधिक काळजीपूर्वक तपासणी करावी. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण सुस्पष्टपणे होईल, याची काळजी घ्यावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा होवू नये, यासाठी नोडल अधिकारी यांनी आवश्यक दक्षता घ्यावी. तसेच सी-व्हीजीलद्वारे प्राप्त तक्रारींवर आवश्यक कार्यवाही तातडीने करावी, असे डॉ. गुर्जर यांनी सांगितले.
खर्च विषयक पथकांनी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. गुर्जर यांनी आढावा घेतला. तसेच संबंधितांना अनुषंगिक सूचना दिल्या.
***
Collector & District Magistrate, Latur
Latur Police Department
Chief Electoral Officer Maharashtra
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.