येल्लोरी (टेंभी) येथे हमीभाव खरेदी केंद्राची सुरूवात
प्रतिनिधीः औसा तालुक्यातील येल्लोरी (टेंभी) येथे महाकिसान संघ व नाफेडच्या वतीने प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड येल्लोरी (टेंभी) येथे आज शासकीय हमीभाव खरेदी केंद्र चालु करण्यात आले असून तालुक्यातील व परिसरातील शेतकरी बांधवांनी सोयाबीन विक्रीसाठी नाव नोंदणी करून घ्यावी.सध्या शासनाने सोयाबीनला ठरवुन दिलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी चालु होते कारण तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाने ठरवून दिलेल्या हमीभावने सोयाबीनची विक्री करायची असेल तर त्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र लागते.त्यामुळे येल्लोरी (टेंभी) येथील प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन शेख रियाज जाफरसाब यांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करून तालुक्यातील व परिसरातील शेतकऱ्यांच्या सोयी साठी महाकिसान संघ व नाफेडच्या वतीने येल्लोरी (टेंबी) येथे शासकिय हमीभाव खरेदी केंद्र चालु केले असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घेण्याचं आवाहन केल आहे.शासकीय हमीभाव सोयाबीन रू 4892 /- असून शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करण्यासाठी २०२४-२५ यावर्षी पिकांची ई-पिक नोंदणी असलेला सातबारा ८ अ,आधार कार्ड झेरॉक्स व राष्ट्रीयकृत बँकेचे खाते पासबुकची झेरॉक्स घेऊन यावी.तरी सर्व शेतकऱ्यांना शासकिय हमीभाव मिळण्यासाठी व आपले आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावरच सोयाबीनची विक्री करावी.संपर्कासाठी प्रगतशील ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड चे चेअरमन शेख रियाज जाफरसाब यांना मो. 9970160711,9881449465 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.