एखादी कार्यपद्धती योग्य अनुसरण केल्यामुळे कमी उर्जा खर्च होते त्यास ऊर्जा संरक्षण म्हणतात - खमितकर
लातूर : दि. १९ मे रोजी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ फूड साइंस एंड टेक्नोलॉजी औरंगाबाद आणि पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या वतीने एनर्जी कॉन्झर्वेशन या विषयांवरती ऑनलाईन लाइव्ह चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. त्यांस चांगला प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमामध्ये मुख्य उपस्थिती प्राचार्या डॉ. स्वाती नखाले आणि पीसीआरए च्या उपविभागीय अधिकारी स्वाती कुमारी यांची होती. झूम ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मराठवाडा विभागातील अनेक विद्यार्थिनी व इतर संस्थेचे शिक्षणोत्तर कर्मचारी सहभागी झाले. मुख्य मार्गदर्शक केदार खमितकर होते. आपले काम पूर्ण करण्यासाठी कमी ऊर्जा घेणारी एखादी कार्यपद्धती योग्य अनुसरण केल्यामुळे कमी उर्जा खर्च होते त्यास ऊर्जा संरक्षण म्हणतात असे यावेळी खमितकर म्हणाले.समाजातील वंचित आणि गरीब घटकांना आर्थिक विकासाचे लाभ मिळण्यासाठी देखील उर्जेचा निश्चितच उपयोग होत असतो.आज आपण व्यापक उर्जा उपलब्धतेच्या युगात प्रवेश करत आहोत. मात्र आजही जगातील एक अब्जपेक्षा जास्त लोकांना वीज उपलब्ध नाही. तर त्यापेक्षाही कितीतरी जास्त लोकांना स्वयंपाकाचे स्वच्छ इंधन उपलब्ध नाही. लोकजागृतीचा माध्यमातून प्रत्येकाने एक युनिट विजेची बचत केली तर राष्ट्राची दोन युनिटची बचत होते - याविषयी खमितकर यांनी मार्गदर्शन केले. पीसीआरए ही भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस मंत्रालयामार्फत चालविली जाणारी एक राष्ट्रीय संस्था आहे.समारोप राष्ट्रीय इंधन संरक्षण प्रतिज्ञेने करण्यात आला."ईंधन संरक्षण की जिम्मेदारी, जनगण की भागीदारी' असा संदेश या वेळी देण्यात आला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.