मागासवर्गीय आधिकारी, कर्मचारी पदोन्नती आरक्षण प्रकरणातील आंदोलनकर्त्या वरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत- उत्तरेश्वर कांबळे
लातुर प्रतिनिधी: लक्ष्मण कांबळे
7 मे रोजी जातीयवादी महाराष्ट्र सरकारने मागासवर्गीय आधिकारी व कर्मचारी यांचे पदोन्नतीमधील आरक्षणाच्या 33 टक्के राखून ठेवलेल्या जागा रद्द करण्याचा संतापजनक निर्णय घेतला त्यामुळे मागासवर्गीय आधिकारी व कर्मचारी यांचा संविधानिक आधिकार नाकारण्यात आल्याने राज्यभरात मागासवर्गीयांच्या विविध, पक्ष संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी ठीक ठिकाणी आंदोलन केले आहेत.
आणी करत आहेत.
पुण्यात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा मागासवर्गीय आधिकारी व कर्मचारी यांच्या पदोन्नती आरक्षण समितीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निवासस्थानाबाहेर भीम आर्मी व आझाद समाज पार्टीचे सक्रीय कार्यकर्ते अभिजित गायकवाड, भीमराव कांबळे, रफिकभाई शेख ,अंकित गायकवाड, शरद लोखंडे, सागर जवळी, महेश थोरात, विनोद वाघमारे, दत्ता भालशंकर,दर्शन उबाळे यांच्यावर भादंवी 353,269,188,270,143,145,147,या अंतर्गत अजामीनपात्र गुन्हे केवळ जातीव्देषातून दाखल करण्यात आलेले आहेत.
हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे असुन आंदोलन करणे हा संविधानिक आधिकार आहे.
त्यामुळे या सर्व आंदोलनकांवरचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. अशी मागणी भीम आर्मीच्या उत्तरेश्वर कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.