निलंगा तालुक्यातील कोकळगावात रात्रीची विनापरवाना वाळू तस्करी करणारे कोण ?*

 *निलंगा तालुक्यातील कोकळगावात रात्रीची विनापरवाना वाळू तस्करी करणारे कोण ?*   

 

*महसूल प्रशासन गप्प का ?*




लातूर : दि. २ -  { व्यंकट पनाळे ) निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील तेरणा नदीच्या परिसरातून अधिकाऱ्यांना मुठीत ठेवून रात्रीच्या अंधाराचा फायदा उठवत अवैधपणे विना परवाना वाळू उपसा मागील काही वर्षांपासून जोमात चालू आहे.

सध्या लॉकडाउनची कडक संचारबंदी असल्याने दिवसा कुणी नजर ठेवेल म्हणून संचारबंदीचे उल्लंघन करत रात्रीच हा वाळू उपसण्याचा धंदा उरकून घेतला जातो आहे. या वाळू तस्करीवर मात्र निलंगा महसुल प्रशासन कुचकामी ठरले आहे. अशी चर्चा नागरिकाद्वारे होताना दिसत आहे. तसेच महसूल प्रशासन हप्ता घेवुन गप्प बसत आहे का ? त्यामुळेच तर वाळू तस्करी करणाऱ्यांना पाठीशी घालत नसतील ना ? असा हि प्रश्न निर्माण होतो आहे. या वाळू तस्करांना कोणाचे पाठबळ आहे ?  तेरणा नदी, ओढे आदी परिसरातील हजारो ब्रास वाळू जे.सी.बी. च्या साहाय्याने काढून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची चर्चा बळीराजा मध्ये होते आहे. रितसर रॉयल्टी भरूनच वाळूची वाहतूक करणे बंधनकारक असताना महसुल अधिकाऱ्यांना मुठीत ठेऊन रात्रीची वाळू तस्करी करीत आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर तेरणा परिसरात होत असलेल्या वाळू माफियांवर व वाळू माफियांना दुजोरा देणाऱ्या महसूल अधिकारी यांच्यावर लक्ष देणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. 

( व्यंकट पनाळे )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या