हजारो हाताचा हातभार कोरोना नियंञणात
युवा नेतेअरविंद पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन
युवा नेतेअरविंद पाटील निलंगेकर यांचे प्रतिपादन
निलंगा ( प्रतिनिधी ) कोरोनाच्या संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत निर्माण झालेल्या भयावह परिस्थिती नियंत्रनात आणणे ही मोठी अडचण असताना आरोग्य व्यवस्था उभा करण्यासाठी हजारो हात एकञ आल्याणे शासकीय रूग्णालयातील यंञणा सक्षम झाल्याने कोरोना नियंत्रणात आला असल्याचे प्रतिपादन युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी व्यक्त केले.
ते आज दि 24 मे रोजी अतिदक्षता विभागाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकत्सक लक्ष्मण देशमुख , उपविभागीय अधिकारी विकास माने , नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे , वैद्यकिय अधिक्षक प्रल्हाद सोळुंके , उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेशकुमार कोल्हे , नायब तहसिलदार घनशाम आडसूळ , डॉ.एस .एस.शिंदे अदी उपस्थित होते.
पुढे बोलताना अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले की , लातूर जिल्ह्यात कोरोना विषाणूने निलंग्यात पहिल्यांदा शिरकाव केला.व एप्रिल महिण्यात त्याचे भयावह रूप पहावयास मिळाले अशी परिस्थिती उदभवणार नाही यासाठी प्रार्थना करू व जिल्ह्यातील शेवटचा कोरोना रूग्णही निलंग्यातून हद्दपार करण्यासाठी सर्वानी एक दिलाने लढण्याची गरज आहे.तिसऱ्या लाटेसंदर्भात अनेक तज्ञ तर्कवितर्क मांडत आहेत . मात्र तिसऱ्या लाटेचे संकट आपल्या तालुक्यावर येणार नाही व आलेच तर सर्वजण मिळून या लाटेवर आपण मात करू यासाठी सर्वानी सज्ज रहावे.शासन ,प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे सहकार्य असल्यास काहीच अशक्य नाही.कोरोना संसर्ग झाल्यानंतर रूग्णाचे मनोबल वाढवण्यासाठी धीर देण्याची गरज आहे.व वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माणसिक बळ देण्याची गरज आहे.त्याच बरोबर अतिदक्षता विभिगात मृत्यू पावलेल्या मृतदेहाची तात्काळ व्यवस्था करावी शिवाय या बाबतचे आदेश जिल्ह्यातील सर्व रूग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राला देण्यात यावे अशा सुचना निलंगेकर यानी केल्या . आणि निलंगा शहरातील शासकीय व खाजगी रूग्णालयातील डॉक्टरचे काम उल्लेखनीय असल्याचे निलंगेकर म्हणाले .यावेळी डॉ तात्यासाहेब देशमुख , डॉ लालासाहेब देशमुख ,डॉ सतिष पाटील डॉ एस.एस.बिरादार, डॉ ढोबळे ,विनोद सोनवणे , बाळू सोमानी ,तम्मा माडीबोने , किशोर जाधव , सुमीत इनानी अदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचलन डॉ भाग्यश्री काळे यानी केले तर आभार वैद्यकिय अधिक्षक डॉ प्रल्हाद सोळुंके यानी मानले.
चौकट
तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी जिल्हा शल्य चिकत्सक लक्ष्मणन देशमुख म्हणाले की , दुसऱ्या लाटेनंतर येणारी तिसरी लाट ही लहान मुलाच्या आरोग्यावर परिणाम करणारी असून त्याचा बंदोबस्त करण्यासाठी शहर व तालुका येथील वैद्यकीय सेवा सतर्क झाली आहे.निलंगेकर यांचे सहकार्य आणि सेवाभावाला आमचा संपूर्ण स्टाफ कृतज्ञ आहे.व लोकशाही मध्ये कोणत्याही गंभीर समस्यावर प्रशासन लोकप्रतिनिधी एकञ आल्याशिवाय त्या पूर्णपणे सुटू शकत नाहीत.त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केले पाहिजे असे देशमुख म्हणाले .
चौकट
औराद शाहाजानी येथील ग्रामीण रूग्णालय एक वर्षापासून पूर्ण झाले होते.केवळ किरकोळ कामासाठी त्याचे लोकार्पण झाले नव्हते परंतु युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यानी केवळ आठ दिवसात संपूर्ण कामे पूर्ण करून जनतेच्या सेवेत तात्काळ सुरू केले असल्याचे पविभागीय अधिकारी विकास माने म्हणाले .
चौकट
नगरध्यक्ष नावाला तंतोतंत शोभणारे व्यक्तीमत्व म्हणजे बाळासाहेब
मागील एक वर्षापासून कोविड काळात अविरत पणे वेळेचे भान न ठेवता सर्वसामान्य रूग्णांच्या हितासाठी जीवाची पर्वा न करता राञंदिवस सेवा देणारा असा नगरध्यक्ष निलंगा नगरीत आतापर्यंतही झाला नाही आणि यापुढेही होणार नाही असे गौरवद्गार युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी नगरध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांचे कौतुक करताना काढले.
Photo By- Narayan Pawle (Tamma) Latur
Mobile No. 9422071717
Mobile No. 9422071717
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.