मुख्यमंत्री यांनी टि.व्ही. वर भाषण देण्यापुर्वी जनतेची काळजी घ्यावी, युवक आत्महत्या करत आहे – खासदार इम्तियाज जलील
औरंगाबाद : लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अॅटोरिक्षाचे हफ्ते भरता न आल्याने आणि रिकव्हरी एजंट यांनी सतत त्रास दिल्यामुळे राजीवनगर झोपडपट्टी, रेल्वेस्टेशन परिसर येथील आत्महत्या करणाऱ्या २७ वर्षीय युवक भिमराव राजु साबळे यांच्या घरी खासदार इम्तियाज जलील यांनी आज भेट देवुन परिवाराचे सांत्वन केले. मयत यांच्या विधवा पत्नी, आई व भावांची यांची विचारपुस करुन एमआयएम पक्षाच्या वतीने आर्थिक मदत ही केली.
दर सोमवारी कोरोना बाबत जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना वर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाचे संबंधित अधिकारी यांची आढावा बैठक असते. सदरील बैठकीत फक्त चर्चा होवुन सर्वसामान्याच्या बाबतीत काहीच तोडगा निघत नसल्याने आणि जनतेच्या उदरनिर्वाह साठी राज्य शासन व जिल्हा प्रशासनाच्या वतीने दाखविण्यात येणाऱ्या उदासिनतेमुळे खासदार इम्तियाज जलील यांनी सदरील बैठकीवर बहिष्कार टाकला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.