बुधोडा सप्टेशन च्या लाईनमेंनची दमदार कामगिरी
औसा प्रतिनिधी औसा 16 रोजी रात्री 11 च्या सुमारास वादळ वाऱ्यामुळे औसा तालुक्यात बऱ्याच काही ठिकाणी पोल पडून, तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता त्याचप्रकारे 33 के व्ही बुधोडा सबस्टेशनसाठी व 33 के व्ही आलमला सबस्टेशन साठी येणारी 33 के व्ही च्या वाहिन्या पण बंद पडल्या होत्या परंतु पावसाचा आणि वाऱ्याचा पण जोर होता पण कुठल्याच परिस्थितीची तमा न बाळगता एरंडी (बुधोडा )शाखेचे कर्मचारी व सहाय्यक अभियंता यांनी रात्री येऊन रात्रभर वाहिन्यांमधील दोष शोधून , दोषी इन्सुलेटर व डिस्क बदलून सकाळी 4 पर्यंत काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम केले, यापूर्वीही बऱ्याच वेळा कोरोनाच्या या भयावह काळात जीवाची पर्वा न करता वीजपुरवठा अखंडित करण्याचं काम हे सर्व कर्मचारी करतात त्याबद्दल ,( बुधोडा ) एरंडी शाखा अंतर्गत असणाऱ्या गावातील जनता खुश असल्याचे दिसून येत आहे. 33 के व्ही चा दोष काढण्यासाठी सहाय्यक अभियंता राहुल गाडे, लालासाहेब बोंबीले, नामदेव राठोड, तुकाराम सगर, गरिषमराज शिंदे, सचिन सूर्यवंशी, साईनाथ शिंदे, धनाजी सर्जे, सुधीर कदम इ कर्मचारी उपस्थित होते या कामगिरीमुळे बुधडा व सारोळा येथील नागरिकांनी यांचे आभार मानले तसेच त्यांच्या कामाचे औसा तालुका मराठा शिव सेवकचे अध्यक्ष आकाश पाटील यांनी विशेष कौतुक केले
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.