औसा इदगाह वर सामुदायिक नमाज होणार नाही... आपआपल्या घरी नमाज पठण करावे...शहर काझी चे आवाहन


औसा  इदगाह वर सामुदायिक नमाज होणार नाही... आपआपल्या  घरी नमाज पठण करावे...शहर काझी चे आवाहन




औसा - कोवीड विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी मुस्लिम बांधवांनी पवित्र रमजान ईद उल फित्र हा सण आपआपल्या घरातच साजरा करावा. या सणाच्या निमित्ताने ईद ची सामूहिक नमाज पठण साठी कोणीही मस्जिदमध्ये,सार्वजनिक ठिकाणी अथवा मोकळ्या जागेत एकत्रीत येऊ नये,या वेळी ही इदगाह येथे सामूहिक नमाज होणार नाही असे आवाहन औसा चे शहर काझी मिर मुझम्मिल अली काझी यांनी केले आहे.रमजान ईद हा पवित्र सण १४ मे रोजी साजरा केला जाणार आहे.या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी अथवा मस्जिदमध्ये एकत्र येऊ नये.जिल्हाभरात कोरोना विषाणू संसर्ग वाढला आहे.तो टाळण्यासाठी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या वतीने ही आदेश जारी करण्यात आले आहेत.जिल्ह्यामध्ये संचारबंदी आहे.प्रत्येकांनी नियमांचे पालन करावे व हा सण घरातच साजरा करावा.हा उत्सव साजरा केला जात असताना सोशल डिस्टन्सिंग पाळणे,तोंडाला मास्क लावणे, सॅनिटायझरचा वापर करणे यावर भर द्यावा. तसेच सर्वांनी आपले कुटुंब आपली जबाबदारी चे पालन करावे.तसेच समाजातील धर्मगुरू,प्रमुख कार्यकर्ते , नेते, सामाजीक कार्यकर्ते यांनी हा सण साधेपणाने साजरा करण्या संदर्भात जनजागृती करावी , असे आवाहन ही शहर काझी मिर मुझम्मील अली काझी यांनी केले आहे .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या