रमजान ईद असतानाही लाॅकडाऊन मुळे औसा बाजारपेठेत शुकशुकाट

 रमजान ईद असतानाही लाॅकडाऊन मुळे औसा बाजारपेठेत शुकशुकाट








 औसा प्रतिनिधी 

‌कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन पृथ्वीराज बीपी जिल्हाधिकारी लातूर यांनी पाच दिवसाचे कडक निर्बंध लागू केले होते .रमजान ईद च्या पूर्वसंध्येला औसा शहरातील मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट होता कोरोना संकटामुळे रमजान ईद ही अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत असून पवित्र रमझान ईदची नमाज ही मुस्लीम बांधव घरी राहूनच  करणार आहेत. महामारी च्या संकट काळात प्रत्येकानी आपली व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी गर्दी टाळण्यासाठी सहकार्याची भूमिका घेतली असून प्रशासनाने केलेल्या आवाहनास, जनतेकडून प्रतिसाद मिळत आहे. रमजान ईद साठी जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून दिनांक 11 मे रोजी लाॅकडाऊन मध्ये शिथिलता देत सकाळी 7  ते  12 वाजेपर्यंत पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरू ठेवल्या  होत्या. तसेच दूध, फळे ,सुकामेवा इत्यादीसाठी सवलत देऊन फळ विक्रेत्यांना सायंकाळी 5 ते 7  या वेळेत गाड्यावर फिरून व्यवसाय करण्यासाठी मुभा देण्यात आली .आज ईद-उल-फित्र म्हणजेच रमजान ईद आणि जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती असल्याने हिंदू-मुस्लीम सर्वधर्मीयांनी सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून घराबाहेर न पडता घरीच राहून आपले उत्सव साजरे करावे असे जिल्हाधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्र प्राधिकरणाने पुन्हा 14 ते 16 मे 2021  पर्यंत खडक निर्बंध लागू केले आहेत. रमजान ईद च्या पूर्वसंध्येला औसा शहरातील बाजारपेठ ओस पडलेली दिसत होती .रमजान सारखा सर्वात मोठा सण असतानाही औसा येथील बाजारपेठेत दरवर्षी मोठी वर्दळ राहत होती. परंतु मागील वर्षापासून सलग दुसऱ्यांदा रमजान ईद वरही कोरानाचे  सावट असल्याने शहरातील बाजारपेठ पूर्णता : बंद असल्याने सर्वच व्यापाऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसला तर ग्राहकांची ही मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याने रमजान ईद मध्ये म्हणावा तसा उत्साह दिसत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या