माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने विविध उपक्रम
शाहिद पटेल
भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न राजीव गांधी यांच्या 30 व्या पुण्यतिथी दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद शहरातील शम्स चौक, ख्वाजा नगर आणि शासकीय रुग्णालयासमोर नागरिकांना हँड सॅनिटायझर व मास्क चे वाटप करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरजभैय्या पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्वासआप्पा शिंदे, जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, आशिष मोदाणी, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सय्यद खलील सर, नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, जिल्हा सरचिटणीस जावेद काझी, उमेश राजेनिंबाळकर, राज कुलकर्णी, अब्दुल लतीफ, धनंजय राऊत, अभिषेक बागल, अलीम शेख, विश्वजित शिंदे, अतुल देशमुख, अजहर पठाण, राहुल लोखंडे, इम्रान हुसैनी, कृष्णा तवले, अदनान सिद्दीकी, समाधान घाटशिळे, कफिल सय्यद, संजय गजधने, नियामत मोमीन, ईफ्तेकार काझी, अभिजित देडे उपस्थित होते.
त्यानंतर जिल्हा काँग्रेस कार्यालयात राजीव गांधी यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, सुरेश पाटील, नितीन बागल, सचिन तावडे, आयाज शेख हेही उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व तालुक्यात स्व.राजीव गांधी यांच्या हुतात्मा दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
तसेच जिल्हा रुग्णालयात युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उमेश राजेनिंबाळकर यांच्या वतीने दररोज पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, या सेवेचे उदघाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सचिन देशमुख, डॉ.मुल्ला, डॉ.गणेश पाटील यांनी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त केले.

0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.