मारुफ भैया शेख यांच्या वतीने ग्रामीण रुग्णालयाला पावती बुक भेट
औसा मुख्तार मणियार
औसा: दि. २१ - शहरात कोरोना आजारासाठी उपलब्ध असलेल्या लसीकरणाला औसा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती. या होणाऱ्या गर्दीकडे मारुफ शेख यांचे लक्ष गेले व त्यांनी एक वेगळीच शक्कल लढवली. बँकेमध्ये ज्याप्रमाणे टोकन सिस्टम असते व त्यामुळे होणारी गर्दी टाळता येते. हाच उपक्रम मारूफ शेख यांनी ग्रामीण रुग्णालय याठिकाणी राबवण्याचा विचार केला व त्यांनी लसीकरणासाठी टोकण बनवून दिले. टोकण देताना मारूफ शेख व वैद्यकीय अधीक्षक अंगद जाधव व कर्मचारी उपस्थित होते.या वेळी बोलताना मारुफ शेख यांनी सर्वांना लस घेण्याचे आवाहन केले व ही लस सुरक्षित आहे असे म्हटले. औसा शहरातील नागरिक लसीकरणामध्ये मागे आहेत व ग्रामीण भागातील अनेकजण या लसीचा फायदा घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. टोकण पद्धत या नवीन उपक्रमामुळे सर्वत्र मारुफ शेख यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.