अन्‍नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून पदाधिकार्‍यांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अन्‍नसेवेचे काम करावे - आ.अभिमन्यु पवार

 

अन्‍नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून पदाधिकार्‍यांनी
कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर अन्‍नसेवेचे काम करावे - आ.अभिमन्यु पवार




लातूर दि.20-05-2021
कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु यावर उपाययोजना करणारी यंत्रणा तोकडी पडत आहे. याकडे राज्य शासनाचेही म्हणावे तसे लक्ष नाही. त्यामुळे रूग्ण व नातेवाईकांना अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यांना लॉकडाऊन असल्यामुळे जेवनही मिळत नाही. ही बाब लक्षात घेवून भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने कै.नागनाथ अण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ अन्‍नसेवा सुरू करून कोरोनाग्रस्त रूग्ण व नातेवाईकांना अन्‍नसेवेचा आधार दिला जात आहे. दिवसाकाठी हजार जणांना अन्‍नसेवा दिली जात असल्यामुळे या उपक्रमाचे कौतुक करून यापुढील कालावधीतही भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी अन्‍नदान हे सर्वश्रेष्ठ दान समजून पदाधिकार्‍यांनी अन्‍नसेवेचे काम करावेे, असे प्रतिपादन औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यु पवार यांनी केले.
यावेळी ते भाजपा युवा मोर्च्याच्यावतीने अटल अन्‍नसेवेच्या माध्यमातून कै.नागनाथ अण्णा निडवदे यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या अन्‍नसेवा उपक्रमास सदिच्छा भेटी दरम्यान ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर देवीदास काळे, भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे प्रशासकीय समन्वयक निळकंठराव पवार,भाजयुमोचे प्रदेश सचिव दत्ता चेवले, भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य रविशंकर केेेंद्रे, जेएसपीएमचे शैक्षणिक समन्वयक संभाजीराव पाटील, समन्वयक बापुसाहेब गोरे, विनोद जाधव, प्राचार्य मोहन खुरदळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आ.अभिमन्यु पवार म्हणाले की, रामभाऊ महाळंगी यांनी भाजपा कार्यकर्ता कसा असावा? याविषयी सांगितले होते. डोक्यावर बर्फाचा गोळा, जिभेवर साखर अन् पायाला भिंगरी लावून काम करणारा कार्यकर्ता असावा असे सांगितले होते. याची प्रचिती आज या अन्‍नसेवेच्या उपक्रमातून आली आहे. कै.नागनाथ अण्णा दिडवदे यांच्या स्मरणार्थ अन्‍नसेवा सुरू करून कोरोनाच्या परिस्थितीमध्ये रूग्ण व नातेवाईकांना मोठा आधार देण्याचे काम भाजयुमोने केलेले आहे. विद्यमान मुख्यमंत्री कोरोनाच्या परिस्थितीमध्ये कोरोनाला भिऊन घरात बसत आहेत. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जनसेवेसाठी सदैव घराबाहेर आहेत. तोच आदर्श कायम ठेवत निरपेक्ष भावनेेने भाजयुमोच्या पदाधिकार्‍यांनी भाजयुमोचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्‍नसेवेचे काम सुरू ठेवलेले आहे. कोरोनाच्या परिस्थितीतही पदाधिकार्‍यांनी हे काम सुरू ठेवलेले आहे. त्यामुळे हे विधायक काम करताना स्वतःची व स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. असे भावनिक आवाहनही आ.अभिमन्यु पवार यांनी यावेळी बोलताना केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा युवा मोर्च्याचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालीब शेख यांनी केले. या कार्यक्रमाला भाजयुमोचे शहर जिल्हाउपाध्यक्ष गजेंद्र बोकण, सरचिटणीस गणेश गोजमगुंडे, सरचिटणीस सागर घोडके, संतोष तिवारी,कार्यालय प्रमुख  आकाश बजाज, चंद्रशेखर पाटील,पंकज देशपांडे, रविशंकर लवटे, प्रेम मोहिते, आकाश पिटले,शुभम पाटील, महादेव पिटले, आदित्य कासले, अविनाथ डुमने, पवन बिडावेजी, पांडूरंग बोडके, यशवंत कदम, राजेश पवार, ओम धरणे, अजय कोटलवार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व जेएसपीएम परिवारातील सदस्य उपस्थित होते.
     
महाराष्ट्र सरकारने 15 लाखापर्यंत  उत्पन्‍न असणार्‍या सर्वांना अनुदान  द्यावे
- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
देशाच्या एकूण कोरोनाग्रस्त रूग्णापैकी जवळपास 40 टक्के कोरोनाग्रस्त महाराष्ट्रामध्ये आहेत. या रूग्णाला ज्या सुविधा वेळीच पुरविल्या पाहिजेत त्या मिळत नाहीत. त्यामुळे अनेक रूग्ण उपचाराविणा मृत्यु पावत आहेत. त्यामुळे रूग्णाच्या उपचारासाठी लागणार्‍या औषधाची माणगी करूनही ती मिळत नाही. देशातील मध्यप्रदेश सरकारने कोरोना परिवाराला दरमहा 5000 रूपये अनुदान व मुलांना शिक्षण मोफत जाहीर केले. दिल्‍ली मुख्यमंत्र्यांनी 50 हजार अनुदान व दरमहा 2500 रू अनुदान तेलंगणा सरकारने राज्यातील सर्वांना अनुदान व सर्वांना मोफत उपचार खाजगी व शासकीय रूग्णालयासाठी जाहीर केले. महाराष्ट्र सरकारने मात्र केवळ कोरोनाग्रस्ताच्या रूग्णाला वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने राज्यातील 15 लाखापर्यंत वार्षिक उत्पन्‍न असणार्‍या सर्वांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी व जिल्ह्यातील कोरोनाग्रस्ताच्या विविध अडचणीकडे शासनकर्त्यांनी लक्ष द्यावे, असे आवाहन मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
--------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या