औसा पाणीपुरवठा योजनेचे लोकार्पण जुलै महिन्याच्या सुरुवातीला व्हावे
आमदार अभिमन्यु पवार यांची आढावा बैठकीत सूचना
औसा मुख्तार मणियार
औसा: औसा शहर वाढीव पाणीपुरवठा योजनेचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम प्राधान्याने करावे. या योजनेची औसा शहरवासीय मागच्या दोन तीन दशकापासून प्रतीक्षा करीत असून जून अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीला या योजनेचे लोकार्पण व्हावे व शहरवासीयांची प्रतिक्षा संपावी यादृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना या बैठकीत आमदार अभिमन्यु पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
औसा तालुक्यातील विकासासंदर्भात दिनांक 19 मे 2021 बुधवार रोजी औसा प्रशासकीय इमारत येथे आमदार अभिमन्यु पवार यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रगतीपथावर असलेल्या कामांचा, मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रस्तावांचा व एकूण विकास कामांचा आढावा घेतला. यावेळी निम्न तेरणा, तावर्जा, व मसलगा प्रकल्पातून पाणीपुरवठा होणाऱ्या किल्लारी व 30 खेडी, मातोळा व खरोसा या पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेतला. मतदार संघातील सर्व मोठ्या पाणी पुरवठा योजना सौर ऊर्जा संचलित करण्याचे तसेच सर्व गावातील पाणीपुरवठा योजना साठी स्वतंत्र रोहित्र बसवून घेण्याचे उद्दिष्ट असल्याचे नमूद करून धरणाच्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी जागा मिळत नसेल तर पाण्यावर उभारण्यासाठी चाचपाणी करून प्रस्ताव दाखल करावे.शेतकऱ्यांच्या वीजबिल रकमेपैकी 33 टक्के रक्कम जी गावाला मिळते त्याचा उपयोग पाणीपुरवठा योजना साठी स्वतंत्र रोहित्रो बसविण्यासाठी करावा, अशी सूचना यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी सर्वच विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.