लातूर येथील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस मिळणार

 

लातूर येथील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा

विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस मिळणार

जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर भव्य प्रशासकीय इमारत  नियोजन भवन उभारणार

महसुळ मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांच्याकडे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचा पाठपूरावा





लातूर प्रतिनिधी : २० मे :  

  लातूर येथील जुन्या रेल्वेस्थानकाची जागा विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस घेऊन त्या बदल्यात राज्यशासनाने राज्यातील इतर ठिकाणची जागा रेल्वेला देणे बाबत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाअमित विलासराव देशमुख यांनी केलेली मागणी महसुल मंत्री नाबाळासाहेब थोरात यांनी मंजूर केली असून त्या बाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत.

  लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय विज्ञान संस्थेस नजीकच असलेली जुन्या रेल्वेस्थानकाची जागा देण्यात यावीत्या बदल्यात राज्यातील इतर ठिकाणची राज्यशासनाची जागा रेल्वेला देण्याचे ठरले होते मात्र सदरील कार्यवाही पूर्ण होण्यास दिरंगाई झाल्यामुळे वैदयकीय महाविदयालयाच्या महत्वाचा प्रकल्प उभारणीचे काम थांबलेले आहेया संदर्भाने पालकमंत्री नाअमित देशमुख यांनी गूरूवारी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात यांची त्यांच्या दालनात भेट घेतलीयावेळी बैठकी दरम्यान झालेल्या चर्चे दरम्यान लातूर येथील रेल्वेची जागा वैदयकीय महाविदयालयात मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहेवरीष्ठ रेल्वे अधिकारी यांच्या सोबतच पूणे  लातूर येथील जिल्हाधिकारी यावेळी उपस्थित होते.

नियोजन भवन  प्रशासकीय इमारत उभारणी

  लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या जागेत भव्य प्रशासकीय इमारत  नियोजन भवन उभारणीच्या संदर्भानेही या बैठकीत चर्चा झाली भाडयाच्या जागेत असलेली सर्व शासकीय कार्यालये एकत्रितरीत्या या नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतीत आणावीत असा निर्णय यावेळी झाला आहेया बैठकीस बाधकाम विभागाचे अधिकारी तसेच वास्तूवीशारद हितेन सेठी  इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

                          

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या