*वाल्मिकी समाजाच्या भावना* *दुखावल्या बदल*
टीव्ही सिरीयल कलाकार मुनमुन हीच्याविरोधात अट्रोसिटी अॅक्ट
अंतर्गत कारवाई करण्याबाबत .
लक्ष्मण कांबळे भिम आर्मी लातुर
तारक मेहता का उल्टा चष्मा या प्रसिध्द हिंदी टीव्ही सीरियल मध्ये बबीता या नावाने काम करणा-या मुनमुन या अभिनेत्रीने आपल्या व्हीडीओ क्लिप मध्ये बोलताना देशातील वाल्मिकी समाजाचा अवमान करून भावना दुखावल्या आहेत. मै अच्छी दिखना चाहती हू भंगी की तरह नही असे संबोधन करून तिने देशात स्वच्छतेचे काम करणा-या वाल्मिकी समाजाविषयी समाजमनात दूषित प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
महोदय
वाल्मिकी समाजातील 90% लोक हे मुंबई महानगरपालिकेसह विविध उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये स्वच्छतेचे काम करतात.हा समाज स्वच्छतेचे काम करतो म्हणूनच देशात रोगराईचे साम्राज्य पसरत नाही. त्यांनी एक दिवसाचा जरी संप केला तर देशात मुंबई महाराष्ट्रात स्वच्छतेचा बोजवारा उडून रोगराई पसरल्याशिवाय राहणार नाही. अशा या देशहिताचे काम करणा-या समाजाविषयी भंगी शब्दाचा प्रयोग करून अभिनेत्री मुनमुन हीने या समाजातील लोक म् अत्यंत अस्वच्छ,घाणेरडे असतात अशी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
तरिही वाल्मिकी समाजाचा जाहीर अपमान केल्याबद्दल मुनमुन हीच्याविरूध्द त्वरीत अॅट्राॅसिटी अॅक्टनुसार कारवाई करावी. तिने देशातील वाल्मिकी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी आपणाकडे करण्यात येत आहे. असे न झाल्यास वाल्मिकी समाज तिच्या घरात कचरा फेको आंदोलन करून तिला तिची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार असे भिम आर्मीचे लातुर जिल्हा महासचिव लक्ष्मण कांबळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री याना ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनात इशारा दिला आहे
...
...
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.