लातुर चे*सामाजिक कार्यकर्ते लहुकुमार शिंदे यांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र

 *लातुर चे*सामाजिक कार्यकर्ते लहुकुमार शिंदे यांचे पंतप्रधानांना खरमरीत पत्र*





लातुर प्रतिनिधि:-


 *मा. पंतप्रधान,नरेंद्र मोदीजी  याना

स. न. वि. वि.

 *पत्रास कारण की,*  सध्या

वैश्विक महामारीचा वाढदिवस गेला आणि दुसरा वाढदिवस आला. इतर देशापेक्षा या महामारीचा फास महाराष्ट्राला विळखा घालत आहे. कोरोणा महामारीला ठेचण्यासाठी आरोग्यसेवा, शासन-प्रशासन लढा देत आहेत परंतु कोणताच काढा, इंजेक्शन याचा आज पर्यंत  गुण आलेला नाही. कोरोना महामारीशी झुंज देऊन संशोधकांनी लस निर्माण केली आणि लसीकरण चालू झाले परंतु लसीकरणावर बरेच निर्बंध लादले. ही लस लहान मुलांना, प्रेग्नंट महिलांना, विद्यार्थी, किशोरवयीनाना, आधार कार्ड नसलेले व्यक्तींना लस दिली जात नाही आणि दुसरे म्हणजे लसीचे महाराजकारण म्हणून लसीकरणाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अनेक तज्ञांच्या मते दुसर्‍या लाटेचा कोरोना हा हवेतून पसरत आहे. हे जर खरे असेल तर ब्रेक द चैन, लॉकडाऊन, मास्क, सैनिटाइजर हे सामान्य जनतेच्या आकलना पलिकडचे आहे. माणसाला सर्दी, खोकला, अंगदुखी या नैसर्गिक व्याधी असून त्या पूर्वापार आहेत व अनंत काळ राहणार. असो.. मानव या नैसर्गिक व्याधीत हळद, तुळशी काढा घेऊन जिवंत राहतात परंतु याच व्याधीने लोक दवाखान्यात जातात तेव्हा कोणतेही दवाखाने रुग्णांना जिवंत राहण्याची हमी देत नाहीत उलट रुग्णांना भावनावश करून अनावश्यक तपासण्या करून मोठ्या प्रमाणात रुग्णांची आर्थिक पिळवणूक करतात म्हणून सामान्य जनतेला दवाखान्याची धडकी भरली आहे. कोरोनाचा अश्वमेघ रोखण्यासाठी सीप्लाने सीप्रेमी, कॅडीला हेल्थकेअरने रेमडेसिविर, सिंजन इंटरनॅशनलने रिमविन, डॉ. रेडिज लॅबने रेडवायएक्स, मेलन ज्युलियंटने जनेरिक्स इत्यादी कंपण्यानी आपले ब्रँड बाजारात अनले त्यातून  रेमडेसिविर इंजेक्शन पुढे आले आणि यातूनच राजकारण सुरू झाले. WHO ची मान्यता नसली तरी रेमडेसिविरचा अश्वमेध थांबता थांबेना तेव्हाच काळाबाजार फोफावला. अनेक डॉक्टर रुग्णांना 6-6 रेमडेसिविर इंजेक्शनचे प्रिस्क्रिप्शन लिहून देतात अन रुग्णांच्या नातेवाईकांना तारेवरची कसरत करूनही, अनेक कसोट्या पार पाडूनही गरजू रुग्णांना इंजेक्‍शन मिळत नाही परंतु काळ्या बाजारात हे इंजेक्शन चढ्या भावाने सहज विकले जाते. रेम डेसिविर इंजेक्शन हे अनेक कंपन्या बनवतात त्यांच्याजवळ मोठा साठा उपलब्ध आहे. परंतु त्यांच्यावर कोणाचेही नियंत्रण नाही. तेच इंजेक्शन बाहेर निर्यात केले जाते त्यामुळेच देशात इंजेक्शनचा तुटवडा निर्माण होत आहे. याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार असलेले मोठे- मोठे रॉकेट उघड होत आहेत. त्यातील काहींना अटक झाली परंतु व ज्यांना अटक झाली नाही ते मात्र उथळ माथ्याने चढ्या भावाने काळाबाजार करत आहेत. परंतु रुग्णाच्या  अप्तजनांना सोसाव्या लागणाऱ्या यातनांचे वेदनादायी प्रसंग दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना महामारी ने अक्राळ-विक्राळ असे रौद्ररूप धारण केले आहे. पहिली लाट गेली, दुसरी लाट आली, तिसरी लाट येणार आणि ही शृंखला अखंड चालूच राहणार. दुसऱ्या देशाची तुटपुंजी मदत घेण्यापेक्षा सर्व सोयींनी युक्त असे प्रत्येक जिल्ह्यात हॉस्पिटल, लॅबरोट्रिज, ऑक्सीजन प्लांट, सर्वरोग निदान संशोधन केंद्र इत्यादी आरोग्यसेवा तयार करा. हा एक *मेक इन इंडिया* चा भाग आहे. या महामारीने देशात तीन लाखापेक्षा जास्त व्यक्ती प्राणास मुकले आहेत. तो आकडा रोज वाढतोच आहे. अंत्यसंस्कारासाठी स्मशानभुमी अपुरी पडत आहे. आता तर अंत्यसंस्कारासाठी टोकण पद्धत चालू आहे. सामान्य जनतेत भीतीचे वातावरण आहे. जनता हवालदिल आहे. सर, तुमची *मन की बात* ऐकण्यासाठी जनतेला जिवंत ठेवा आणि कोरोनाच्या लाटा थोपवण्यासाठी ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, रेमडेसिविर इंजेक्शन जनतेला विनामूल्य द्या कारण आता पहाण्याची, बघण्याची, विचार करण्याची वेळ नसून कृती करण्याची वेळ आहे.       

    धन्यवाद!

                      सामाजिक कार्यकर्ता

                     लहूकुमार शिंदे लातूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या