पोटाची खळगी भरण्यासाठी प्रखर उन्हात ही मजुरांची कसरत

 पोटाची खळगी भरण्यासाठी प्रखर उन्हात ही मजुरांची कसरत 


औसा (प्रतिनिधी) 



शेतकरी शेतमजुरांना दररोज काबाड कष्ट केल्याशिवाय चरितार्थ चालवता येत नाही. कोरोना विषाणूचा संकटकाळात अनेकांचे रोजगार गेले आहेत कडक लॉकडाऊन मुळे व्यापारी व्यापार व इतर कामे बंद असल्यामुळे मजुरांनी आता शेतीवरच आता कामाचा आधार शोधला आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी प्रखर उन्हाची तीव्रता असतानाही शेतमजुरांची जीवघेणी कसरत सुरु आहे. महात्मा बसवेश्वरांनी आपल्या कामातच परमेश्वर आहे असे सांगितले असून काबाड कष्ट करणाऱ्यांना संसारात काही कमी पडत नाही म्हणून  कोरोना सारख्या भिषण संकट काळात सुध्दा शेतमजूर शेतावर कष्ट उपसण्याची कामे करीत आहेत.

कोरोणाच्या संकटामुळे मजुरांनाही गावात विनाकारण न फिरता मोकळ्या वातावरणात शेतातील कामे करण्यात वेगळा आनंद मिळत असून सोबत कामाचा मोबदला मिळाल्याने कुटुंबाला आर्थिक आधार ही मिळतो आहे.

 त्यामुळे ग्रामीण भागातील मजुरांना आपल्या कामातच सध्या सत्याचा वाली परमेश्वर!!दिसत आहे.कोरोना संकट काळात मजूरवर्ग कामात गुंतला असून त्यांच्या चेहर्‍यावर प्रखर उन्हात ही आनंद दिसून येतो.

सध्या तीन आठवड्यावर मान्सूनचे आगमन आले असून शेतकरी वर्गही शेतातील पेरणीपूर्व मशागत नांगरणी वखरणी धसकट वेचणे शेतातील दगड-गोटे वेचून बांधावर टाकून शेतीची बांधबंदिस्ती करणे अशा कामात गुंतला आहे.शहरातील बांधकाम व इतर कामे बंद असल्याने ग्रामीण भागातील मजूर मोठ्या प्रमाणात शेतीवरचा कामाला वळला असून पेरणी पूर्वीचे सर्व कामे करण्यासाठी शेतकऱ्यांनी सहभाग असल्याने मजुरांची उपलब्धता होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या