देवाच्यादारी कीर्तनाची वारी मध्ये औशाच्या दोन भूमिपुत्रांचा आज सहभाग
औसा प्रतिनिधी
फक्त मराठी या वाहिनीवरील श्रीविठ्ठलाची महती सर्व वारकरी संप्रदाय यांना पाहता यावी म्हणून देवाची दारी कीर्तनाची वारी हे सदर सुरू आहे या सदरात औसा तालुक्यातील दोन भूमिपुत्रांच्या कार्यक्रमाचे प्रसारण आज दिनांक 22 मे रोजी सकाळी 7:30 वाजता होणार आहे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे औसा तालुका अध्यक्ष ह.भ.प. कुमार पाटील गांजन खेडा यांचे नाम संकिर्तन प्रसारित होणार असून औसा येथील मारुती राम गुरव हे मृदंगाचार्य म्हणून साथ-संगत करणार आहे श्री विठ्ठलाच्या भक्तीमध्ये सर्व जाती-धर्माचे वारकरी तल्लीन होतात कोरोना लॉक डाऊन मुळे धार्मिक कार्यक्रम अखंड हरिनाम सप्ताह यांना बंदी असल्याने विठ्ठल भक्तांना देवाची दारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमातून घरी सुरक्षित राहून आनंद घेण्याची व्यवस्था फक्त मराठी वाहिनीने केली आहे या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण सोमवार दिनांक 24 मे 2021 रोजी सकाळी 6,30 वाजता होणार आहे तरी सर्व भक्तांनी औशाच्या भूमिपुत्रांच्या कार्यक्रमाचा टीव्ही वरून आनंद घ्यावा असे कळविण्यात येते,
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.