माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कडून कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप.

 

माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी

निमित्त लातूर शहर जिल्हा काँग्रेस कडून

कोविड१९ प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप.






 

लातूर प्रतिनिधी : २२ मे :  

  आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान भारतरत्न राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त संबंध देशभरात काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून विविध सामाजिक उपक्रम राबवित अभिवादन केले जात आहे.

  लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने देखील २१ मे रोजी भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली व त्यानंतर लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कोविड १९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर नागरिकांना कोविड१९ प्रादुर्भाव याला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली, या प्रादुर्भाव काळात मास्क वापरण्याची चे फायदे सांगत जनजागृती केली, यावेळी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांना  मास्कचे वाटप केले. कोरोना प्रादुर्भावाचा काळा मास्क वापरणे स्वतःसाठी व इतरांसाठीही सुरक्षेचे असल्याचे त्यांना पटवून दिले 

  या जनजागृती व मास्क वाटत मोहिमेत लातूर शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड.किरण जाधव,मनपा सदस्य विजयकुमार साबदे, पुनीत पाटील, ॲड.देविदास बोरूळे पाटील,महेश काळे, ज्ञानेश्वर सागावे, अमित जाधव,अभिषेक पतंगे,बालाजी झिपरे, एम.एच.शेख, अकबर माडजे, अभिजित इगे, युनूस शेख, जफर पटवेकर, राजू गवळी, नारायण साठे, कुणाल वांगज, करीम तांबोळी, विजय टाकेकर, जय ढगे यांच्यासह लातूर शहर जिल्हा काँग्रेस चे पदाधिकारी ,सदस्य सहभागी झाले होते.

--------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या