कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्यास परवागनी द्यावी
भाजपा नगरसेविका सौ. भाग्यश्री कौळखेरे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भाजपा नगरसेविका सौ. भाग्यश्री कौळखेरे यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
लातूर/प्रतिनिधी ः- कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. या लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यापासून अनेक व्यवसाय बंद ठेवावे लागले आहेत. मागील वर्षीही लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद ठेवावे लागले होते. या कारणाने व्यापार्यांची आर्थिक परिस्थिती डबघाईला आलेली असून शासनाचा महसुलही बुडत आहे. ही बाब लक्षात घेऊन शहरातील व्यापार्यांना कोरोनाचे नियम पाळून दररोज दोन ते तीन तास दुकान उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाच्या नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. भाग्यश्री कौळखेरे यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे केली आहे.
कोरोना संसर्ग हा सर्वांसाठीच धोक्याचा आहे. या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात सध्या कडक निर्बंध म्हणजे लॉकडाऊन करण्यात आले आहे. मागील वर्षी सुद्धा कोरोनाच्या वाढत्या संसर्गानेच लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या दरम्यान व्यवसाय बंद ठेवण्यात आलेले आहेत. व्यापार्यांना आपले व्यवसाय बंद ठेवावे लागत असल्याने दुकानामधील कर्मचार्यांचे वेतन देणे सुद्धा जिकरीचे ठरू लागलेले आहे. सदर व्यवसाय बंद ठेवण्यात आल्याने व्यापार्यांची आर्थिक घडी विस्कटलेली असून त्याची परिस्थिती बिकट होऊ लागलेली आहे. त्याचबरोबर शासनाचा महसुल सुद्धा बुडत आहे. सध्या लॉकडाऊनमध्ये अशंतः शिथिलता देण्यात आली आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूचे व्यवसाय करणारी दुकाने सुरु झालेली आहेत. मात्र इतर दुकाने अजूनही बंदच आहेत.
इतर व्यापार्यांचा सहानुभूतीक विचार करून आणि त्या व्यापार्यांवर अवलंबून असणार्या कुटूंबाचा विचार करत कोरोनाचे नियम पाळण्याचे बंधन घालत व्यवसाय सुरु करण्याची परवानगी द्यावी. सदर व्यवसाय किमान दोन ते तीन तास करण्यासाठी परवानगी दिल्यास कांही अंशी दिलासा मिळणार आहे. त्यामुळेच व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी निवेदनाद्वारे भाजपाच्या नगरसेविका तथा जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. भाग्यश्री कौळखेरे यांनी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. व मनपा आयुक्त अमन मित्तल यांच्याकडे केली आहे. या निवेदनावर नगरसेविका सौ. ज्योती आवस्कर यांचीही स्वाक्षरी आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.