ऑनलाईन व्हर्च्युअल औद्योगिक कार्यशाळेस उत्तम प्रतिसाद
लातूर, शुक्रवार दि. २१ मे रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औसा आणि पेट्रोलियम संरक्षण अनुसंधान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्हर्च्युअल औद्योगिक एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली, त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला. प्राचार्य जी.आर. कलमे, संयोजक शेंद्रे आनंद व पीसीआरए च्या उपविभागीय अधिकारी श्रीमती स्वाती कुमारी यांची प्रमुख उपस्थिती होती. व्याख्याता केदार खमितकर प्रमुख मार्गदर्शक होते. सूर्य हा ऊर्जेचा मुख्य स्रोत आहे. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत. दिवसातील १२ तास सौर ऊर्जा आपल्या बरोबरच असते. उरलेल्या १२ तासांसाठी आपण सौर ऊर्जेची साठवण करून रात्रीच्या वेळी उपयोगात आणू शकतो यासाठी खर्च सुद्धा अल्पप्रमाणात येतो. विद्युत ऊर्जा जेव्हा अतिशय महत्त्वाची असते. त्या दिवशी मिळत नाही. परंतु सुर्यापासून मिळणारी ऊर्जा आपला दिवस व वेळ बदलत नाही. म्हणून बदलत्या काळानुसार आपण जास्तीत जास्त प्रमाणत सौर ऊर्जेचा वापर केला पाहिजे. सौर ऊर्जेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर करण्यास शिकले पाहिजे असे खमितकर यावेळी म्हणाले.ऑनलाईन व्हर्च्युअल प्रशिक्षण कार्यक्रमात वेगवेगळ्या ठिकाणांहून १५० विद्यार्थीं विद्यार्थिनी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.