पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी लातूर जिल्ह्यातील साखरा गावचे सुपुत्र आणि हरंगुळचे जावाई बाळासाहेब नरारे यांचा झाला वार्तालाप...

 पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याशी लातूर जिल्ह्यातील साखरा गावचे सुपुत्र आणि हरंगुळचे जावाई बाळासाहेब नरारे यांचा झाला वार्तालाप...



{ व्यंकटराव पनाळे }

लातुर : दि. १४ - पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपये जमा करून देशातील काही शेतकऱ्यांशी चर्चा केली. या योजने अंतर्गत महाराष्ट्रातील लातूर तालुक्यातील साखरा गावचे सुपुत्र आणि हरंगुळ (बु.) गावचे जावाई शेतकरी बाळासाहेब नरारे यांच्याशी संपर्क साधला. आज पंतप्रधान आणि शेतकरी यांच्यात होणाऱ्या वार्तालापा साठी देशभरातून सहा शेतकरी तर महाराष्ट्रातील एकमेव  लातूर जिल्ह्यातील बाळासाहेब दरारे यांची निवड झाली होती. यावेळी बाळासाहेब नरारे यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या किसान क्रिडेट कार्ड योजनेचा लाभ झाल्याचे सांगितले.

बाळासाहेब नरारे यांना साडेपाच एकर शेती असून या शेतीवर जवळपास ८ ते ९ कुटुंबं अवलंबून आहेत. वर्षाला त्यांना साधारण दोन लाख रुपयांचे वार्षिक उत्पन्न शेतीतून मिळते. गेल्या पाच वर्षापासून बँकेशी जोडले गेल्याची माहिती नरारे यांनी दिली. आज देशाच्या पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळाली याबद्दला त्यांनी अतिशय आनंद व्यक्त करून स्वतःला भाग्यवान असल्याचे सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या सहकार्यातून शेतीसाठी अर्थसहाय्य मिळाल्याचं समाधान हि त्यांनी व्यक्त केले. शेती करत असताना आपल्याला बँक ऑफ महाराष्ट्राच्या किसान क्रेडिट योजनेचा चांगला लाभ झाल्याचाही त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला.

बाळासाहेब नरारे यांच्याशी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी बोलत असताना नरारे यांच्या हिंदी बोलण्याचे ही विशेष कौतुक केले. आणि बाळासाहेब नरारे यांना पंतप्रधानांनी शुभेच्छा देऊन आरोग्याची काळजी घेण्याबद्दलही सांगितले. 


*बँकेच्या दृष्टीने गौरवाचा दिवस : गिरीश भगुरकर*

पंतप्रधानांशी बोलण्याची संधी मिळालेले महाराष्ट्रातील लातुर जिल्ह्यातील साखरा या गावचे बाळासाहेब नरारे हे शेतकरी बँक ऑफ महाराष्ट्रशी जोडले गेले आहेत. त्यामुळे आमच्यासाठी ही गोष्ट फारच गौरवाची आहे. लातूर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतुन मराठवाड्याच्या पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेतंर्गत कोरोनाचे संकट संपताच लाभ मिळेल या दृष्टीने आमचा प्रयत्न सुरु असल्याचे माहिती विभागीय व्यवस्थापक गिरीश भगुरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या