कोरोणासी लढा या विषयावर पदमभूषण डॉ.अशोक कुकडे यांचे फेसबुक लाईव्ह व्याख्यान
लातूर दि.26/05/2021
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर जिल्हयाच्यावतीने कोरोणाच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजीक उपक्रम राबवीले जातात त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून भाजयुमोच्यावतीने लातूरचे भुमीपुत्र पदमभूषण डॉ.अशोक कुकडे काका यांचे कोरोणाशी लढा, प्रबोधन, प्रशिक्षण,सामाजीक भान या विषयावर फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून 28 मे 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता व्याख्यान होणार आहे.
भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा लातूर शहर जिल्हयाच्यावतीने जागतीक संकटात सापडलेल्या जनतेला दिलासा देण्यासाठी अनेक सामाजीक उपक्रम राबविले जातात यामध्ये भाजयुमोच्यावतीने कोविड 19 हेल्पलाईन, कै. नागनाथअण्णा निडवदे यांच्या स्मरनार्थ अटल अन्नसेवा असे उपक्रम राबविले जात आहेत. कोरोणाच्या प्रार्दूभावतून आजूनही लातूरकर सावरले नाहीत ही बाब लक्षात घेउन कोरोणा बाबत सविस्तर जनजागृती करण्यासाठी 28 मे 2021 रोजी युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्या फेसबुकवरून पदमभूषण डॉ.अशोक कुकडेकाका यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आलेले आहे. त्यामुळे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून कोरोणा लढा प्रबोधन, प्रशिक्षण आणि सामाजीक भान या विषयावरील व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे अवाहन भाजयुमोचे शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर व भाजपा युवा मोर्चा लातूर शहर जिल्हा टिमच्यावतीने करण्यात आलेले आहे.
--
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.