*लातुर व्यापारी महासंघाचे कोण पिळले काण ?*
*दुकाने उघडायची सोडून, हाती बोर्ड घेऊन, गाऊ लागले याचणेच गाणं !*
*दुकाने उघडणार अशी केलेली पदाधिकाऱ्यांची पोकळ घोषणा हवेतच विरली...*
*व्यापारी महासंघातच नाही एकमत, म्हणतात एकमेकाला बघा यांची कशी जिरली ?*
लातुर : दि. १७ { व्यंकटराव पनाळे } - लातूर व्यापारी महासंघाने दिनांक १३ मे २०२१ वार गुरुवार रोजी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना निवेदन देऊन दुकाने उघडण्याची परवानगी द्या. लॉकडाऊन मुळे आमचा व्यापार बंद आहे. आमच्यावर कर्जाचा डोंगर वाढतो आहे. आमची उपासमार होत आहे. आता आम्ही हे सहन करू शकत नाही. जिल्हाधिकारी साहेब आम्हाला दुकाने उघडण्याची परवानगी देऊन सहकार्य करावे.अन्यथा आम्ही शनिवार दिनांक १५ मे २०२१ पासून सर्व व्यापारी दैनंदिन व्यवहार चालू करणार असल्याचे कळवले होते.
मात्र आज दिनांक १७ मे रोजी लातूर व्यापारी महासंघाच्या सभासदांनी दुकाने उघडायची सोडून, दुकाने उघडायला परवानगी द्या असे हातात बोर्ड घेऊन हनुमान चौक ते गंजगोलाई पर्यंत लातूर व्यापारी महासंघाचे सभासद जिल्हाधिकाऱ्यांकडे याचणेच गाणे गात आहेत.
लातूर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रदीप सोळंकी, सचिव मनीष बंडेवार, कोषाध्यक्ष विनोद गिल्डा, उपाध्यक्ष विश्वनाथ किणीकर यांच्या स्वाक्षरीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन दुकाने उघडण्याचा दिलेला इशारा हा *फुसका बार* ठरल्याचे दिसत आहे.
लातूर व्यापारी महासंघाचे कोणी कान पिळले आहेत काय ? अशीही चर्चा लोक करत आहेत. लातूर व्यापारी महासंघाने दुकाने उघडणार अशा केलेल्या घोषणेमुळे लोकांना बाजार सुरू होईल असे वाटले होते. व्यापारी हिम्मत दाखवतील आणि दुकाने उघडतिलच अशा अपेक्षेने लोक पाहात होते. परंतु हे लातूर व्यापारी महासंघाचे पदाधिकारी तर *पंक्चर* झाले ! असाही सूर बाहेर निघाला आहे.
दुकाने उघडणार अशी केलेली पदाधिकाऱ्यांची पोकळ घोषणा हवेतच विरली...।
व्यापारी महासंघातच नाही एकमत, म्हणतात एकमेकाला बघा यांची कशी जिरली ? ।।
याबद्दलही उलटसुलट चर्चा रंगली आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.