स्वयं शिक्षण प्रयोग सेवाभावी संस्थेचे ऊलेखनिय कार्य: अंजली मसलकर

स्वयं शिक्षण प्रयोग सेवाभावी संस्थेचे ऊलेखनिय कार्य: 

 अंजली मसलकर












 औसा मुख्तार मणियार

औसा तालुक्यातील नागरसोगा येथील स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेचे तालुका समन्वयक अंजली मसलकर यांनी सामाजिक कार्य करत आहे .1993 पासून ग्रामीण भागामध्ये महिला सक्षमीकरण आणि दुष्काळ निवारण हे काम करत आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांसोबत सेंद्रिय शेती प्रशिक्षण देण्यासाठी व व्यवसायाचे प्रशिक्षण देणे ,शेतकरी आत्महत्या ह्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत या उद्देशातून काम करत आहे महिलांना शेतीपूरक व्यवसायिक बनवणे शासकीय योजना लिंक करून देणे

 अल्पभूधारक महिलांसोबत काम करत आहे

 covid-19 धुमाकूळ घातला आहे गेल्यावर्षीपासून त्या वातावरणामध्ये मी औसा तालुक्यात महाराष्ट्रात सात जिल्ह्यामध्ये तर काम करत आहे पण औसा तालुक्यामध्ये पन्नास गावांमध्ये काम करत प्रत्येक गावांमध्ये जनजागृती हात धुण्याचा डेमो दाखवणे, आहाराबद्दल ऑनलाईन महिलांना प्रशिक्षण ,देणे गरीब गरजू लोकांना गेल्या वर्षी एक हजार कुटुंबांना अन्नधान्य वाटप करण्यात आले .साबण, मास्क, सानी ट्रेझर हे पण वाटप करण्यात आली. शेती मशागत साठी ऑनलाईन ट्रेनिंग उगवणक्षमता बीज प्रक्रिया करण्यास प्रत्येक शेतकऱ्यांना घरा घरीच ऑनलाईन ट्रेनिंग च्या माध्यमातून सांगण्यात आले आहे 12 मे 2021 रोजी स्वंय शिक्षण प्रयोग संस्थांच्या वतीने आरोग्य विभाग जिल्हा परिषद लातूर यांना उत्तम गूणवत्तेचे 1000 पिपीई किट देण्यात आले.

स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेच्या वतीने 1993 च्या भुकंपात लातूर, उस्मानाबाद भागासह 12 राज्यात 6 लाख महिला लोकासोबत लोकसहभाग, पुनर्वसन उद्योजकता कृषी विकास क्षेत्रात महिला सक्षमीकरणासाठी झटणारी सेवा भावी संस्था आहे . गेल्या वर्षी लातूर, उस्मानाबाद व सोलापूर जिल्ह्यात 3 लाख एन 95 मास्क  व एक लाख साबण वितरण या संस्थेने केले आहे. शिवाय 4 हजार  गरजू कुंटुबाना अन्न धान्य व स्वच्छता साहित्याचे संचही वितरण केले आहे.महिलांना  झुमद्वारे प्रशिक्षण व माहिती देऊन त्यांना कोरोना काळातही व्यवसायिक म्हणून  टिकविण्यासाठी माहिती, संवाद,पाठबळ व अर्थसाह्य ही संस्था करत आहे .स्वंय शिक्षण प्रयोग संस्थेचे, 

 डायरेक्टर प्रेमा गोपालन ,उपमन्यु पाटील, दिलीप धवन, माळवदकर, लक्ष्मीकांत औसा तालुका समन्वयक अंजली मसलकर या सर्व स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या सामाजिक कार्यात सहभागी झाले होते.अशी माहिती अंजली मसलकर यांनी आज रोजी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या