पक्ष कार्यकर्ते दत्ता मस्के यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व लातूर शहर जिल्हा काँग्रेसने स्वीकारणार

 

पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार

 

पक्ष कार्यकर्ते दत्ता मस्के यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व लातूर शहर जिल्हा काँग्रेसने  स्वीकारणार 

 

 ऍड . किरण जाधव








लातूर (प्रतिनिधी):

 

 कोरोनामुळे अकस्मित निधन झालेले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते दत्ता मस्के यांच्या दोन्ही मुलांचे शैक्षणिक पालकत्व काँग्रेस पक्ष घेणार असल्याचे लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. किरण जाधव यांनी  सांगितले आहे.

 

 लातूर शहरातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते दत्ता मस्के यांचे कोरोनामुळे  नुकतेच निधन झाले आहे. त्यांच्या पत्नी श्रीमती वर्षा दत्ता मस्के या महानगरपालिकेत विद्यमान नगरसेविका आहेतदत्ता मस्के त्यांच्या कुटुंबातील कर्ते प्रमुख होतेत्यांचे आकस्मिक निधन झाल्याने कुटुंबाची मोठी अडचण झाली आहे या परिस्थितीत त्यांचा मुलगा  दक्ष मस्के   व  मुलगी शर्वरी मस्के   यांचे    शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून  दोन्ही मुलांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी काँग्रेस पक्षाने घ्यावी अशी सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली होती. पालकमंत्री ना. अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार  या दोन्ही मुलांचे  शैक्षणिक पालकत्व काँग्रेस पक्ष स्वीकारून त्यांचा शैक्षणिक खर्च लातूर शहर जिल्हा काँग्रेस करणार असल्याचे एडवोकेट किरण जाधव यांनी आज जाहीर केले आहे.

----------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या