एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन ची कार्यवाही, घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपींना 03 लाख रुपयाच्या मुद्देमालासह 24 तासात जेरबंद

          *एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन ची कार्यवाही, घरफोडी च्या गुन्ह्यातील आरोपींना 03 लाख रुपयाच्या मुद्देमालासह 24  तासात जेरबंद.*






          लातूर प्रतिनिधी

        या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 13/06/2021 ते 14/06/2021 चे मध्यरात्री अंबाजोगाई रोड, वर असलेल्या एका कुरियर कंपनीचे शटर कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी उचकटून अंदाजे 1,52,866/- रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. त्यावरून पोलीस ठाणे एम.आय.डी.सी. येथे गुन्हा रजिस्टर नंबर 363/2021 कलम 457, 380, 34 भा. द. वि. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

                       सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता  पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नेहरकर, पोलीस अंमलदार राजेंद्र देशमुख, सोन्याबापु देशमुख,  समीर शेख, युवराज जाधव व डी.बी.पथकाचे पोलीस अमलदार  भीमराव बेल्लाळे युवराज गिरी,मुन्ना मदने, प्रशांत ओगले,मदार बोपले यांचे पथक तयार करून गुन्हा उघडकीस आणण्याचे अनुषंगाने सूचना व मार्गदर्शन करण्यात आले.

                सदर पोलीस पथकाने लागलीच नमूद गुन्ह्या उघडकीस आणण्याच्या दिशेने गुन्हेगारांची माहिती काढत असताना मिळालेल्या गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे

1) कौस्तुभ अरुणराव राऊत, वय- 25 वर्ष ,राहणार- अंबाजोगाई जिल्हा बीड.

2)  मंथन रामचंद्र काळे, वय 19 वर्ष, राहणार -उस्मानाबाद 

यांना लातूर येथूनच ताब्यात घेऊन गुन्हा संदर्भाने विचारपूस केली तेव्हा नमूद आरोपींनी  सदरचा घरफोडीचा गुन्हा केल्याचे कबूल करून गुन्ह्यात चोरलेला 1,52 ,866/- रुपयाचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटरसायकल असा एकूण 3,02,866/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

                  पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर)श्री. जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली एम.आय.डी.सी. पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी अवघ्या 24 तासात आरोपींच्या मुसक्या आवळून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नेहरकर ,पोलीस अमलदार चिंचोलीकर हे करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या