अकृषिक व गुंठेवारीबाबत प्रशासनाने कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी* *-पालकमंत्री अमित देशमुख*


*अकृषिक व गुंठेवारीबाबत प्रशासनाने कायद्यातील

 तरतुदीप्रमाणे कार्यवाही करावी*

                                                                *-पालकमंत्री अमित देशमुख*







 

*महापालिकेने गुंठेवारीच्या अर्जावर  तात्काळ कार्यवाही करून  नोंदी घ्याव्यात;  एकाही नागरिकाला नाहक त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी*

 

*लातूर शहरा लगतच्या गुंठेवारीच्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करावा*

 

लातूर, दि.16(जिमाका):- राज्य शासनाने 2001 एक पूर्वी खरेदी केलेले गुंठेवारी चे प्लॉट योग्य ते कागदपत्रे पाहून नियमित करण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. त्याप्रमाणे लातूर जिल्ह्यातील गुंठेवारी व अकृषक जमिनीबाबत शासन निर्णयातील तरतुदी प्रमाणे प्रशासनाने कार्यवाही करावी, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले. 

      शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात आयोजित कृषी को गुंठेवारी संदर्भात आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापौर विक्रांत गोजमगुंडे, महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, महापालिकेचे विरोधी पक्ष ॲड. दीपक सूळ, उपविभागीय अधिकारी सुनील यादव, तहसीलदार स्वप्निल पवार, नगररचनाकार सुनील मिटकरी, जिल्हाध्यक्ष भूमिअभिलेख सुदाम जाधव व अन्य मान्यवर उपस्थित होते.

        पालकमंत्री पुढे म्हणाले की एका गटातील एकाच प्लॉटची खरेदी 2001 पूर्वी झाली असेल तर त्या एकाच प्लॉटला कागदपत्रे पाहून नियमित करता येईल; परंतु संपूर्ण गटाला नियमित करता येणार नाही. त्यामुळे प्रशासनाने लातूर शहरालगतच्या  गुंठेवारी चे नियमित करण्याच्या दिलेल्या आदेशाची सखोल चौकशी करावी व त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

       लातूर महापालिकेच्या हद्दीत गुंठेवारी चे अर्ज घेऊन येणाऱ्या नागरिकांचे नियमानुसार व विहित मुदतीत अर्ज निकाली काढावेत. संबंधित नागरिकांना महापालिकेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

     शासन निर्णयातील नियमानुसार सन 2001 पूर्वी खरेदी केलेल्या व एन ए लेआउट नसलेल्या प्लॉट ला नियमित करता येऊ शकते. त्यामध्ये काही चूक नाही. गुंठेवारी ला एन ए लेआऊट ची आवश्यकता नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी देऊन बाभळगाव येथील गुंठेवारी नियमित करण्याबाबत देण्यात आलेल्या आदेशाबाबत चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

      प्लॉट ची  एन. ए. लेआउट अंतिम झाल्यावरच खरेदीखत होणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीमध्ये इंटेरियम लेआउट वरच खरेदी होत असल्याने त्यात बदल करण्याबाबत कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी व्यक्त केली.

                                                                            ****

 वृत्त क्र.474                                                                        दिनांक:-16 जून 2021

*आरोग्य विभागातील रिक्त पदांची

भरती प्रक्रिया तात्काळ राबवावी

                                         - पालकमंत्री*

लातूर, दि.16(जिमाका):- आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था यांच्या कडील रिक्त पदांची माहिती तात्काळ वरिष्ठ कार्यालयास सादर करावी व त्या अनुषंगाने पदांची भरती प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे निर्देश राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिले.

          शासकीय विश्रामगृहा च्या सभागृहात आरोग्य विभागातील भरती या अनुषंगाने आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री देशमुख बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., महापालिका आयुक्त अमन मित्तल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

      कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागात रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया तात्काळ राबविण्याबाबत राज्य शासनाकडून मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील आरोग्य विभागातील सर्व यंत्रणांनी त्यांच्याकडे रिक्त असलेल्या पदांची माहिती तात्काळ द्यावी. तसेच जी भरती प्रक्रिया त्यांच्या अधिकारात आहे ती भरतीप्रक्रिया त्यांनी तात्काळ  राबवावी. उर्वरित रिक्त पदांची माहिती जिल्हा निवड मंडळ किंवा वरिष्ठ कार्यालयाला देऊन आपल्या यंत्रणेतील सर्व रिक्त पदे तात्काळ भरून घेण्याबाबत पाठपुरावा करावा, असे निर्देश पालकमंत्री देशमुख यांनी दिले.

           राज्य शासनाच्या 14 जून 2019 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील पद भरती बाबत नियमावली जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातील पद भरतीची प्रक्रिया माहे ऑगस्ट 2021 अखेर पूर्ण करण्यात येईल असे माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी दिली. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्याकडील पदांच्या भरतीबाबत निवड मंडळामार्फत कार्यवाही करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर देशमुख व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर परगे यांनी आरोग्य यंत्रणेतील रिक्त पदे या अनुषंगाने माहिती दिली.

          

                           *****

 

                                                 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या