मा.आमदार अभिमन्यूजी पवार साहेब यांच्यामुळे गुणवंत रामतीर्थे यांना न्याय मिळण्यांच्या आशा पल्लवित ..... . ......
.भूतमुगळी ते लिंबाळा जाणारा पाणंद रस्त्यांची आज दि.08/06/2021 मंगळवार रोजी रस्त्यांची मार्किंग (खूणा) करण्यात आल्या आहेत .
यावेळी
भूमिअभिलेख कार्यालय निलंगा येथील श्री स्वामी साहेब , मंडळाधिकारी श्री खुर्दे साहेब , तलाठी सौ. स्वामी मॅडम , ग्रामसेवक सुतार साहेब , सरपंच सतीश चव्हाण , चेअरमन रामकिसन सावंत ,
अर्जदार गुणवंत माणिक रामतीर्थे तसेच शेजारील संबंधित सर्व शेतकरी भुतमूगळी ते लिंबाळा जाणाऱ्या पाणंद रस्त्याचे मार्किंग करीत असताना उपस्थित होते.
सदर रस्ता अतिक्रमण मुक्त करण्या कामी वरील अधिकारी व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले . या शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याकामी औसा तालुक्यांचे लोकप्रिय आमदार मा. अभिमन्यूजी पवार साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. सर्व शेतकऱ्यासाठी हा रस्ता खुला होण्यांचे संकेत दिसत असल्यामुळे अर्जदार गुणवंत रामतीर्थे व सर्व शेतकरी वर्गातून आनंद व्यक्त केला जात आहे. व सर्व स्तरातून या कार्याबद्दल आमदार साहेबांचे कौतुक केले जात असून , आभार मानले जात आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.