*शिवार ने 134 शेतकऱ्यांना केले आत्महत्याच्या विचारातून परावृत्त*
दि .28 -
उस्मानाबाद - बँकेत चक्रा मारून हे कर्ज मिळत नाही सरकारच्या शेतकऱ्यांना कोण कोणत्या योजना आहेत महागडे बियाणे घेतले पण उगवलेच नाही नुकसान झाले पण भरपाई झालीच नाही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 1982 तक्रारी आतापर्यंत सरांनी शिवार हेल्पलाइनवर मागील वर्षभरात नोंदविण्यात आले यापैकी 134 शेतकरी आत्महत्येच्या विचाराने ग्रासलेच्या धक्कादायक प्रकार समोर आला संबंधित शेतकऱ्यांना या नाजूक मनस्थितीतुन बाहेर काढण्यासाठी शिवार हेल्पलाइनच्या मानसोपचार तज्ञ यांनी प्रयत्न केले असतात त्यांना यशही आले यातील काहींना कर्ज करण्यासाठी थेट बँकेशी संपर्क करून मदत केली.
कधी नापिकीचा फिरा तर कधी कधी दुष्काळाचे चटके आदी समस्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक दुष्टचक्रात सापडत आहेत यातच कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत अशा विचाराने ग्रासलेल्या शेतकऱ्या अशा विचाराच्या चक्रातून बाहेर काढण्यासाठी जिल्ह्यात मागील वर्षी जून महिन्यात हेल्पलाइन सुरू करण्यात आली होती, कामामध्ये जिल्हाभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपली समस्या व अडचणी मांडले.
शासनाकडून अनुदान मिळाला नाही, प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळाला नाही, बँकेतून कर्ज मिळाले नाही, व्यापाऱ्याकडून फसवणूक झाली, सावकाराने पैशासाठी तगादा लावला, रोजगार हमी योजनेत कामगारांना मजुरी मिळाली नाही अशा अनेक प्रकारच्या समस्या या हेल्पलाईनवर 1982 प्रकारच्या तक्रारी नोंदविण्यात आल्या.,एकही तक्रार अनुत्तरीत राहणार नाही याची खबरदारी शिवार हेल्पलाइन कडून करण्यात आली. हे हेल्पलाइन प्रशासनाच्या सहाय्याने शिवार कडून व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातून चालविली जाते.
*लातूर रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक *लातूर रिपोर्टर* 9975640170
Mail :Laturreporter2012@gmail. com
Web :www.laturreporter.in
*उस्मानाबाद* प्रतिनिधी *अल्ताफ शेख /*महेबुब सय्यद*
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.