अल्ताफ शेख प्रतिनिधि उस्मानाबाद,
*आजपासून राज्यात नवे निर्बंध ! - प्रत्येकाने वाचा महत्वाचे अपडेट*
कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लसचा धोका लक्षात घेता - महाराष्ट्र सरकारने नवे नियम आणले आहेत
त्यानुसार राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या स्तरात करण्यात आला - तसेच तिसऱ्या स्तरातील जुने निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत
*कसे आहेत नवे नियम ?*
नव्या नियमावलीनुसार अत्यावश्यक सेवेतील दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील - तर इतर वस्तू आणि सेवांचा व्यवहार करणारे दुकाने - सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहतील - तर रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेने - सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील - लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी बंद राहील
तसेच आता कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी - तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही - तसेच अत्यावश्यक सेवेत नसलेली सर्व दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील
धार्मिक स्थळे बंद राहतील - नागरिकांना सायंकाळी ५ नंतर रस्त्यावर फिरता येणार नाही - नियमांचे काटेकोरपणे पालन न झाल्यास दंडात्मक कारवाई होईल
हे सर्व नियम आहेत मात्र प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक प्रशासन , यामध्ये आणखी काही बदल करू शकते - यामध्ये आपण केवळ येव्हढे लक्षात घ्या कि -
*नव्या नियमानुसार* - आता पाच स्तराऐवजी राज्याची विभागणी तीन ते पाच अशा स्तरांत करण्यात आली आहे - यामुळे गेल्या आठवडय़ात पहिल्या व दुसऱ्या स्तरात असणारे सारे जिल्हे - आता तिसऱ्या स्तरात समाविष्ट झालेत.
*राज्यात आजपासून लागू होणारे निर्बंध* - प्रत्येक व्यक्तीसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.