सुलभ शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 3 हजार रुपये थकीत हप्ता जमा करा
खुंदमीर मुल्ला
औसा मुख्तार मणियार
औसा शहरातील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सुलभ शौचालय बांधकामासाठी नगर परिषद च्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या प्रत्येकी 3 हजार रुपये प्रोत्साहन निधीचा थकित हप्ता वाटप करा अशी प्रमुख मागणी विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुस्तफा मुल्ला यांनी दि.29 जुन 2021 मंगळवार रोजी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना एक निवेदन सादर केले आहे. या निवेदनात त्याने असे नमूद केले आहे. औसा शहरातील स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत सुलभ शौचालय बांधकामासाठी राज्य शासनाकडून 3600 च्या वर लाभार्थ्यांना एकूण 12 हजार रुपये निधी वाटप करण्यात आलेले आहे. या 12हजार रुपये निधीच्या व्यतिरिक्त औसा नगरपालिकेने नगरपालिकेच्या वतीने तीन हजार रुपयांचा अतिरिक्त निधी एकूण 15 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. पण सदरील घोषणा होऊन तीन ते चार वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना सुद्धा नगर परिषदेने आज रोजी पर्यंत लाभार्थ्याच्या खात्यामध्ये फक्त 12 हजार रुपये टाकले आहे. व उरलेल्या 3 हजार रुपये चा हप्ता टाकलाच नाही ही गंभीर बाब आहे. तरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना औसा शहरातील अंदाजे 3600 च्या वर सुलभ शौचालय बांधकाम केलेल्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये 3000रुपये थकीत हप्ता जमा करावी अशी विनंती निवेदनाद्वारे विलासराव देशमुख युवा मंचचे शहराध्यक्ष खुंदमीर मुल्ला यांनी केली आहे. या निवेदनावर व खुंदमिर मुल्ला,दिपक कांबळे या दोघांच्या सह्या आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.