लातूरातून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू
-निजाम शेख यांची माहिती
बिदर-लातूर- मुंबई,कोल्हापूर- पुणे गाड्या पूर्वीप्रमाणेच धावणार
लातूर/प्रतिनिधी :
कोरोनामुळे मागील अनेक महिन्यांपासून खंडित असणारी रेल्वेसेवा आता पूर्ववत सुरू होणार आहे. लातूर येथून धावणाऱ्या बिदर-लातूर -मुंबई,कोल्हापूर-नागपूर या गाड्या दि.१ जुलै पासून पुन्हा प्रवाशांना सेवा देणार असल्याची माहिती महाराष्ट्र मध्यप्रदेश कर्नाटक झोनल रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी दिली.
मागील अनेक महिन्यांपासून कोरोनामुळे रेल्वेसेवा थांबविण्यात आली होती.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी रेल्वेकडून खबरदारी म्हणून वाहतूक थांबविण्यात आलेली होती. मागील काही दिवसात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.रुग्णसंख्या घटलेली आहे.रेल्वेने काही मार्गावर प्रवासी वाहतूक सेवा सुरू केलेली आहे.त्यामुळे लातूरातून धावणाऱ्या या दोन्ही गाड्या सुरू कराव्यात अशी मागणी रेल्वेच्या झोनल सल्लागार समितीचे सदस्य निजाम शेख यांनी केली होती.यासंदर्भात रेल्वेच्या महाप्रबंधकांसमवेत त्यांनी परत पत्रव्यवहारही केलेला होता.
या मागण्यांची दखल घेत महाप्रबंधकांनी दि.१ जुलै पासून रेल्वेसेवा पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत.रेल्वे सेवा पूर्ववत होत असल्याने प्रवाशांना मोठा फायदा होणार आहेर.लातूर येथून आठवड्यातील ४ दिवस लातूर-मुंबई तर ३ दिवस बिदर- मुंबई ही रेल्वे पूर्वी धावत असे.याशिवाय कोल्हापूर-नागपूर ही रेल्वेही लातूरातून जात असे. पूर्वीप्रमाणेच या दोन्ही रेल्वे गाड्या दि.१ जुलै पासून धाऊ लागतील,असे निजाम शेख यांनी सांगितले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे.त्यामुळेच रेल्वे प्रशासनाने आपली मागणी मान्य केली आहे.तरीदेखील प्रवाशांनी कोरोना विषयक सुरक्षिततेच्या निकषांचे पालन करावे.कोरोनाचा संसर्ग अधिक वाढणार नाही याची दक्षता घेऊनच प्रवास करावा.मास्क आणि शारीरिक अंतराच्या नियमाचे पालन करून स्वतःसह इतर प्रवाशांच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी,असे आवाहन निजाम शेख यांनी केले आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.