*स्थानिक गुन्हे शाखेची कार्यवाही, 35 किलो गांजा पकडला,एकास अटक.*
लातूर प्रतिनिधी
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भिसे वाघोली तालुका लातूर येथे छापा टाकून उसाच्या शेतात असलेली गांजाची 13 झाडे एकंदरीत 34 किलो 900 ग्रॅम गांजा मुद्देमाल किमती अंदाजे 2 लाख 10000 सह एका आरोपीस अटक केली आहे.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या फिर्याद वरून नवनाथ नामदेव वायाळ आणि नामदेव नारायण वायाळ यांच्या विरोधात पोलिस ठाणे मुरुड येथे गुन्हा रजिस्टर नंबर 149 /2021 कलम 20 (अ), 20 (ब) , 20 (क) गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनो व्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS act ) 1985 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून नवनाथ वायाळ याला अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे यांच्या आदेशावरून जिल्ह्यात अवैध व्यवसाय करणाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर धाडी मारुन कार्यवाही करण्याचे सत्र सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक श्री. हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर ग्रामीण) श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा लातूरचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन भातलवंडे ,नायब तहसीलदार राजेश जाधव, पोलीस अंमलदार संपत फड ,अंगद कोतवाड, युसुफ शेख, राम गवारे , हरून लोहार, सचिन मुंडे, राजाभाऊ सूर्यवंशी , सदानंद योगी, प्रदीप चोपणे यांच्यासह मुरुड पोलीस स्टेशन येथील पोलीस उपनिरीक्षक सुर्वे ,पोलीस अंमलदार सचिन राठोड , पोलीस बीट अंमलदार खोत , केंद्रे , गुंडे , शिंदे, भारती तलाठी आचार्य , बोधने , आणि दोन शासकीय पंचासह दिनांक 14 जून 2021रोजी भिसे वाघोली तालुका लातूर या ठिकाणी नवनाथ नामदेव वायाळ याचे उसाचे शेतात छापा मारला असता त्या ठिकाणी गांजाची 13 झाडे मिळून आली, सदरचा मुद्देमाल 34 किलो 900 ग्रॅम एवढा गांजा मुद्देमाल किमती 2 लाख 10000 रुपयाचा पोलिसांनी जप्त केला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे करीत आहेत.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.