शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी सवलतीच्या दरात महाबीज बियाणे व डीएपी खत उपलब्ध करून द्या: एम आय एम पक्षाची मागणी

 शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी सवलतीच्या दरात महाबीज बियाणे व डीएपी खत उपलब्ध करून द्या: एम आय एम पक्षाची मागणी





औसा मुख्तार मणियार

औसा: सध्या खरीप पेरणीचा हंगाम सुरू झाला असून वाढत्या महागाईमुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाचे बियाणे तसेच डीएपी खत उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकरी त्रस्त होत आहे.प्रत्येक कृषी केंद्रामध्ये डीएपी खत आणि महाबीज कंपनीच्या बियाण्याची विचारणा केली असता आमचेकडे महामंडळ चे बियाणे डीएपी खत शिल्लक नसल्याचे सांगत आहे.यासाठी एम आय एम पक्षाच्यावतीने औसा तहसीलदार यांना दिनांक 15 जून 2021 मंगळवार रोजी निवेदन दिले आहे. त्या निवेदनात सर्व शेतकऱ्यांना महाबीज कंपनीचे सवलतीच्या दरातील बियाणे उपलब्ध करून द्यावे,डीएपी खताचा कृत्रीम तुटवडा दाखवून शेतकऱ्यांची अडवणूक करण्याचा कृषी सेवा केंद्राचा स्टॉक तपासून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दोषींवर गुन्हे दाखल करावे, सर्व शेतकऱ्यांना पेरणीपूर्व महाबीज बियाणे व डीएपी दर्जेदार कंपनीचे खत त्वरीत देण्याची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना खरीप 2020 चा पिक विमा सरसकट मंजूर करावा. अशी मागणी एम आय एम पक्षाच्या वतीने औसा तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी औसा यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी या निवेदनावर एम आय एम पक्षाचे अॅड.गफुरूल्ला हाशमी,सय्यद मुजफ्फर अली इनामदार, अॅड.आर एम शेख यांच्या स्वाक्ष-या आहेत.

रिपोर्टर नियुक्त करना है

पूरे महारष्ट्र भर में और मराठवाड़ा खूसूसन लातूर ज़िले के हर देहात तालुके में , उसमानबाद बीड औरंगाबाद नांदेड़ परभणी सोलापुरजिले के हर तालुके में लातूररिपोर्टर के रिपोर्टर नियुक्त करना है इच्छुक व्हाट्सअप पर sms करें

9975640170

Mail laturreporter2012@gmail.Com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या