मुस्लिम आरक्षण बाबतीत ठाकरे सरकारने भुमिका स्पष्ट करावी..!

 मुस्लिम आरक्षण बाबतीत ठाकरे सरकारने भुमिका स्पष्ट करावी..!

.............

*  मुस्लिम विकास परिषद संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष प्रा.वहिदाभाभी यांनी मुस्लिम आरक्षण मागणीसाठी लोकशाही सनदशीर मार्गाने सन 2001 पासून केलेला संघर्ष व आंदोलन संग्रहित  

*  मुस्लिम आरक्षण बाबतीत राजकीय पक्षांनी लादलेली नेतृत्व मुस्लिम नेते गप्प का ?

*  मुस्लिम आरक्षण बाबतीत महाविकास आघाडी शासन उदासीन





महाराष्ट्रात राज्यात   महाविकास आघाडीचे शासन असून महाराष्ट्र राज्याच्या  मुख्यमंत्री पदी मा. उध्दव बाळासाहेब ठाकरे   मुस्लिम आरक्षणाच्या  बाबतीत  भुमिका स्पष्ट करतील का ?   अशी महाराष्ट्र राज्यभरातुन सामाजिक संघटना यांच्या कडून  मागणी होत आहे महाराष्ट्र राज्यात सध्या  शिवसेना ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष  , आखील भारतीय काँग्रेस पक्षाचे  संयुक्त सरकार आहे  शासन स्थापन करता वेळी  असे चित्र निर्माण केले गेले कि मुस्लिम आरक्षण हे महाविकास आघाडी शासन देईल तशी घोषणा हि करण्यात आली होती पण  घोषणा मात्र हवेतच राहून गेली व मा.नवाब मलिक अल्पसंख्याक  मंत्री यांनी मुस्लिम आरक्षाण बाबतीत  विचार सुरू असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यात महत्वाची भूमिका घेईल म्हटले होते तर काँग्रेस पक्षाचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लागु केलेले 5% शिक्षणात दिलेंल आरक्षण द्यावे अशी मागणी हि झाली होती पण ते ही महाविकास आघाडी शासनाने केले नाही पण सध्याच्या स्थितीत महाविकास आघाडी शासनातील मंत्री अगोदर प्रसिद्ध माध्यमातून  कोणत्याही योजनेची घोषणा करतात व पुन्हा मुख्यमंत्री हे माहिती सांगतील अशी माहिती देतात या वरून सध्या राज्यात काय स्थिती चालू आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही केवळ  श्रेय घेण्यासाठी हि धावपळ होय  असे विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमातून म्हटलं आहे असो सत्ताधारी व विरोधी याच्यात संघर्ष आहे पण यात मात्र मुस्लिम  समाजा विषयी कोणत्याही शासनाला किंवा राजकीय पक्षाला  देणे घेणे नाही असे दिसून येते मग तो मोहसीन शेख हत्याकांड असो की इतर कोणतेही विषय व समस्या असोत   समाजाची मात्र बदनामी करून आरोपीच्या पिंज-यात उभे केले जाते ऐवढे मात्र निश्रि्चत  आहे उठसूट कोणीही उठतो व मुस्लिम  समाजास बदनाम करतो पण मुस्लिम समाज या विचाराने जगतो कि स्वातंत्र्य लढ्यात आमचे पुर्वज यांनी योगदान व बलिदान दिले हा इतिहास आहे पण तो इतिहास हा जगासमोर ,  जनतेसमोर ,  समोर आला नाही नव्हे  तो इतिहास कारांनी समोर येवुच दिला नाही तरीही या भारत मातेच्या  मातीत आम्ही जन्माला आलोत.

या भारत मातेच्या हितासाठी  आम्ही आपल्या जिवाची पर्वा न प्राण देवु जर शत्रू  तिरक्या नजरेने पाहत असेल तर त्याचे डोळे काढु या विचाराने जगणारा हा समाज आहे   समाजहित , देशहित जोपासु हे वेगळे सांगण्याची गरज नाही आम्ही भारत मातेचे देणे आहोत हा विचार मनात आहे पण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मात्र प्रसिद्ध माध्यम  मुस्लिम समाजातील समस्याची बाजू शासना समोर ठेवत नाही  असो सध्या तरी लोकशाही हि हुकुमशाही होत चाललेली आहे..का ?  असे सर्वत्र दबक्या आवाजात प्रतीक्रीया ऐकावयास मिळत आहे  केवळ निवडणुकीत व्यासपीठावर राजकीय पक्षाकडून  लोकशाही चा गवगवा केला जातो ?  पण लोकशाही नुसार न्याय मिळत नाही ?  यासाठी जन आंदोलन उभी राहताहेत याचा विचार केला जात नाही ? किंवा जनतेच्या हिताचे  म्हणणे ऐकून घेतले जात नाही असे दिसून येते  निवडणुकीत मात्र  राजकीय पक्ष  व्यासपीठावर मुस्लिम समाजातील लादलेले नेते यांना व्यासपीठावर बसवून  शेर शायरी म्हणून घेतात वाहवा करतात हेच तुमचे नेते आहेत असे चित्र निर्माण  करतात केवळ निवडणुकीत निवडून येण्यासाठी केले जाते यानंतर मात्र निवडणूका  संपल्या की  हे नेते गायब होतात अशी स्थिती आहे यातून काहीच साध्य होत नाही.

 मात्र  सोशल मीडियावर  मुस्लिम स्वयघोषीत , नेते , नेतृत्व , संघटना राजकीय पक्ष हे मात्र  भलेमोठे डिजिटल पोस्टर  व्हिडीओ , लावून जयजयकार करतात व वाहवा मिळवतात यापुढे काहीच नाही केवळ  मुस्लिम समाजातील शिक्षणाचा कमी अभाव असल्याने मुस्लिम राजकीय  नेते मात्र समाजाची दिशाभूल करतात ऐवढे यावरून मुस्लिम आरक्षण बाबतीत ठाकरे सरकार भुमिका स्पष्ट करेल का ..? अशी महाराष्ट्र राज्यभरात चर्चा होत आहे




अब्दुल समद शेख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या