शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत म्युकरमायकॉसिस झालेल्या 81 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया*

 


*शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत  म्युकरमायकॉसिस

झालेल्या 81 रुग्णांवर यशस्वी  शस्त्रक्रिया*






 

*म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण 462 रुग्णांची आजतागायत तपासणी*

 

*म्युकरमायकॉसिसचे लवकर निदान झालेल्या रुग्णांमध्ये उपचाराचे चांगले परिणाम* 

 

*म्युकरमायकॉसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या इंजेक्शनचा पुरवठा नियमित होतो*

 

*आजपर्यंत एकुण 1306 इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी झाला असुन 160 इंजेक्शन रुग्णालयात उपलब्ध*

 

*या आजाराची लक्षणे दिसताच रुग्णांनी तात्काळ कान, नाक व घसा विभागामध्ये तपासणी करावी*

 

 

लातूर ,दि.15(जिमाका):- विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामध्ये म्युकरमायकॉसिस या आजारांच्या एकुण 462 रुग्णांची आजतागायत तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कान नाक घसा विभागामध्ये आजपर्यंत एकुण 444 रुग्णांची तपासणी करण्यात आली असुन त्यापैकी म्युकरमायकॉसिस या आजाराच्या 100 रुगणांवर या रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आला असुन सद्यस्थितीत 46 रुग्ण कान नाक घसा विभागामध्ये दाखल आहेत.  या आजाराची तपासणी केलेल्या रुग्णांपैकी 81 रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करण्यात आल्या असल्याची माहिती अधिष्ठता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली आहे. 

     तपासणी व उपचार करण्यात आलेल्या रुग्णांपैकी 72 रुग्णांना शुगर होती, 82 रुग्णांना कोविड उपचारादरम्यान Steroid चा वापर करण्यात आला होता व 07 रुग्णांना इतर अजार होते. आजपर्यंत 55 रुग्णांवर (Functional Endoscopic Sinus Surgery) नाकाच्या श्वास घेण्याच्या ठिकाणच्या हवेच्या पोकळया (Sinus) काढुन टाकण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच 44 रुग्णांवर (Partial Maxillectory) टाळुचा जबडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तसेच 02 रुग्णांवर (Debridement of Orbital Floor) डोळयाच्या खालील हाडाची  शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, असेही डॉक्टर देशमुख यांनी सांगितले. 

       तसेच आजतागायत 18 रुग्णांना डोळयाच्या पाठीमागे (Retrobulbar) Inj. Amphotericin B देवुन रुग्णांच्या डोळयांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत व 06 रुग्णांमध्ये बुरशी बाधीत डोळा काढुन टाकण्यात आला आहे. म्युकरमायकॉसिस या आजारावर उपचार करण्यासाठी आवश्यक असणारे Inj. Amphotericin B हे रुग्णसंख्येच्या आवश्यकतेनुसार जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडुन नियमितपणे पुरवठा केला जातो.  आजपर्यंत एकुण 1306 इंजेक्शनचा वापर रुग्णांसाठी करण्यात आला असुन 160 इंजेक्शन हे सद्यस्थितीत या रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत. 

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयामधील म्युकरमॉयकोसिसची लागण झालेल्या  एकुण 12 रुग्णांचा मृत्यु झाला असुन त्यापैकी 09 रुग्णांचा मृत्यु हा Post Covid गुंतागुंतीच्या आजारामुळे झाला असुन 03 रुग्णांचा मेंदुमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मृत्यु झाल्याची माहिती डॉक्टर देशमुख यांनी दिली.

             म्युकरमायकोसिस किंवा काळी बुरशी म्हणजे हे एक Fungal Infection आहे. याचा संसर्ग सामान्यत: नाकातुन सुरु होतो व तो हळुहळू Sinus, जबडा, डोळा व मेंदुपर्यंत पसरतो. कोविड झालेल्या रुग्णांमध्ये केवळ काही विशिष्ट परिस्थितीत म्युकरमायकोसिस होण्याचा धोका असतो. त्यामध्ये अनियंत्रित मधुमेह,  Steriod मुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होणे, दीर्घकाळ अतिदक्षता विभागात ॲडमिट राहणे, अवयव प्रत्यारोपण झाल्यास किंवा कर्करोग झाल्यास बुरशीचा प्रादुर्भाव वाढतो. 

बुरशीचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांना त्वरीत ॲडमिट करुन Inj. Amphotericin B हे शिरेमार्फत डॉक्टरांच्या निगराणीखाली देण्यात येते. हे इंजेक्शन साधारण दोन आठवडयापर्यंत देण्यात येते. शस्त्रक्रियेद्वारे बुरशीची लागण झालेला भाग काढुन  टाकण्यात येतो. साधारणत: 15 दिवसानंतर औषधोपोचराने रुग्ण बरा होतो. दर पंधरा दिवसाला रुग्णांची Endoscopy तपासणी करण्यात येते. काळया बुरशीचे निदान करण्यासाठी नाकातील खपलीची Biopsy करुन KOH Staining केली जाते. लवकर निदान झालेल्या रुग्णांमध्ये उपचाराचे चांगले परिणाम दिसुन येत आहेत, असे डॉक्टर देशमुख यांनी म्हंटलं. 

             काळया बुरशीची लक्षणे ही सामान्यत: नाक कोंडणे, डोळे लाल होणे, नजर कमी होणे, तीव्र डोकेदुखी, गालदुखी, दात हलु लागणे व टाळुला जखम होणे अशी आहेत. ही लक्षणे दिसुन येताच रुग्णांनी तात्काळ कान नाक घसा विभागामध्ये तपासणी करुन घ्यावी असे आवाहन डॉ. सुधीर देशमुख,  विभागप्रमुख कान नाक घसा डॉ. विनोंद कंदाकुरे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. संतोषकुमार डोपे,विभागप्रमुख बधिरीकरणशास्त्र डॉ. शैलेंद्र चौहाण, विभागप्रमुख औषधवैद्यकशास्त्र विभागडॉ. निलिमा देशपांडे,  विभागप्रमुख दंतचिकित्साडॉ. रितेश वाधवानी, सहयोगी प्राध्यापक नेत्रविभागडॉ. नंदकुमार डोळे, डॉ. प्रदीप खोकले यांनी केले आहे.

                   

 

                                                             *********

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या