वय वर्षे 45 पुढील नागरिकांना covid-19 लसीकरण कार्यक्रम संपन्न
Covid-19 लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन बोरफळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून सरपंच श्री बालाजी गिरे हे उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच बालाजी यादव ,नागनाथ साळुंके, ग्रामसेवक श्री राठोड साहेब, प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड येथील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमजद पठाण, सी.एच.ओ अनिता वाघमारे तसेच शाळेचे मुख्याध्यापक शेख सर तसेच त्यांचे सर्व शिक्षक सहकारी, सहशिक्षक गुरमे व्ही.डी यांची उपस्थिती होती. प्रथम सरपंच यांच्या हस्ते फित कापून लसीकरण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांचे लसीकरण झाले. त्यानंतर बोरफळ येथील ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी व दिलीप कुलकर्णी यांचे सपत्नीक लसीकरण झाले. तसेच राजेंद्र कुलकर्णी यांनी सपत्नीक लसीकरण केले. ग्रामपंचायत बोरफळ प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड, उपकेंद्र बोरफळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरफळ यांच्या वतीने लसीकरण करण्याचा कार्यक्रम अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आला. सदर कार्यक्रमाबाबत ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य कर्मचारी बंडे जी.जी, श्रीमती चव्हाण डी.आर, श्रीमती सुरवसे सुरेखा, ज्योती घोडके, तारामती यादव आशा कार्यकर्ती सुरवसे सिंधू, दीपा कंठेकर, द्रोपदी कांबळे, मंगल चव्हाण तसेच गजगे बाई यांनी परिश्रम घेतले.
विलास कुलकर्णी ज्येष्ठ पत्रकार औसा 9552197268
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.